Swapna Ani Satya Mulakhat Ek Pravas (स्वप्न आणि सत्य मुलाखत एक प्रवास) (Interview) MPSC / UPSC Bhushan Deshmukh, Anuj Pahade
मनोगत
हे पुस्तक केवळ मुलाखतीसाठी तयार केलेलं मार्गदर्शक नव्हे. तर ते एका उमेदवाराच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याचा प्रवास समजून घेणाऱ्या दृष्टिकोनातून लिहिलं आहे. मुलाखत ही केवळ काही प्रश्नांना उत्तरे देण्याची प्रक्रिया नसून, ती तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाची परीक्षा असते. बुद्धिमत्ता, विचारशक्ती, आत्मविश्वास, संवाद कौशल्य, आकलनक्षमता आणि निर्णयक्षमता या सगळ्यांची एकत्रित चाचणी म्हणजेच “मुलाखत”.
या पुस्तकाच्या निर्मितीचा उद्देश एकच उमेदवारांना या शेवटच्या टप्प्याच्या लढाईसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे. अनेक विद्यार्थी लेखी परीक्षेत उत्तम यश मिळवतात, पण मुलाखतीच्या वेळेस आत्मविश्वास कमी पडतो, उत्तरांचा सुसंगत विचार करता येत नाही, किंवा आपली पात्रता प्रभावीपणे मांडता येत नाही. यामागे केवळ ज्ञानाचा अभाव नसतो, तर ‘सादरीकरणाची’ (Presentation) तयारी अपुरी असते. स्वप्न ते सत्य हे पुस्तक त्याच गरजेला उत्तर देण्यासाठी तयार केलं आहे.
या पुस्तकात मी केवळ संभाव्य प्रश्नांचा संग्रह केलेला नाही, तर उत्तरांची बांधणी, विचारांची दिशा आणि सुसंगत सादरीकरण यावर भर दिला आहे. व्यवहारातील दृष्टिकोन, मुलाखतीचे अनुभव, महिला आणि सामाजिक प्रश्न यांचा समावेश करून प्रशासनिक समज विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. माझा वैयक्तिक अनुभव आणि अनेक यशस्वी विद्यार्थ्यांच्या वाटचालीतून मिळालेल्या शिकवणींनी हे पुस्तक अधिक समृद्ध केलं आहे.
लेखक – भूषण देशमुख / अनुज पहाडे
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.