STEP UP Vedh Chalu Ghadamodi Visheshank June 2024 Te August 2025-Swapnil Patil,Dilip Khatekar
लेखकाचे मनोगत
लेखकाचे मनोगत
माझ्यासाठी अपार कह सोसणारी, माझ्या जीवनालाच स्वतःचे जीवन मानून त्यात समाधान मानणारी, माझ्या उज्वल भविष्यासाठी माझ्या स्वप्नांना सतत खतपाणी घालणारी, माझी आई
तिला हे माझे प्रथम विशेषांक ‘वेध’ स्नेहपूर्वक कृतज्ञतेच्या अखंड भावनेने अर्पण करताना माझ्या हृदयात अपार आनंद आणि अभिमान दाटून येत आहे.’
त्यांची राहिलेली स्वप्ने माझ्या मध्ये बघणारे माझे वडील ‘दिलीप पाटील यांना माझी कलाकृती आदरपूर्वक सादर माझा लहानपणापासूचा मित्र असलेला माझा भाऊ ‘स्नेहदीप’ याला बंधू प्रेमाने हा विशेष अंक सादर
प्रिय स्पर्धापरीक्षार्थींनो !,
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून, तसेच दिल्लीतील अभ्यासिकांतून, आपल्या स्वप्नांना आकार देणाऱ्या तुम्हा माज्या परीक्षाधीसमोर, चालू घडामोडींचे STEP UP चे पुस्तक ‘घेध’ ठेवताना मला एक वेगळीच आनंदाची भावना अनुभवास येते.
‘वेध’ हा केवळ चालू घडामोडींचा संकलनग्रंथ नाही; तर तो माझ्या मनातील स्पर्धा परीक्षांच्या प्रवामाबद्दलची आस्था,
मेहनत आणि स्वप्न यांचे प्रतिबिंच आहे. पुस्तकाच्या प्रत्येक पानामागे परिश्रम, जबाबदारीची जाणीव आणि तुमच्या यशाची प्रखर आस्था दडलेली आहे. जून 2024 पासून ते ऑगस्ट 2025 पर्यंतच्या सर्व घडामोडींना अभ्यासक्रमाच्या चौकटीत बसवून समजावून सांगण्याचा प्रयत्न या विशेष आवृत्तीत केलेला आहे.
आजच्या माहितीच्या महासागरात संबंधित, उपयुक्त आणि परीक्षाभिमुख गोष्टी निवडणे ही खरी कला आहे. तुमच्या किमती वेळेची बचत व्हायी आणि शेवटच्या क्षणापर्यंत आत्मविश्वासाने पुनरावलोकन करता याच विचाराने ‘बेध’ पडवले गेले आहे.
चंदा 2025 रोजी होणान्या Rajyaseva, Combine पूर्व परीक्षात तुम्ही झेप घेणार आहात. 2026 मध्ये UPSC आणि प्रथमच वर्णनात्मक स्वरूपाठ होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षाच्या (MPSC “First Deserpitive Mains’) नख्या अध्यायासमोर उभे राहणार आहात. या सर्व पायऱ्यांसाठी आवश्यक ती शिस्तबद्ध तयारी करण्याच्या उद्देशानेच हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचवले आहे.
हे पुस्तक आणताना STEP UP अकॅडमीचे संचालक ‘माननीय दिलीप खाटेकर सर’ हे गेल्या महिन्यांपासूर स्वतः जातीने लक्ष घालून हा दर्जेदार विशेष अंक उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. खाटेकर सर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि तुमच्यामुळे ही माझी कलाकृती (Artistic Brainchild) सर्व विद्यार्थ्यांकडे पोहोचत आहे, याबद्दल सर मी तुमचा ऋणी आहे.
आमचे मित्र श्री अविनाश शितोळे सर, DTP मधील भाम्यश्री मॅडम, प्रतिभा मॅडम, विद्या मॅडम आणि प्रणव (Graphics Team) यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या विशेष अंकासाठी माहिती संकलन करताना माझे मित्र ‘अमित सुरसे’ आणि ‘समीर शेख यांचे विशेष सहकार्य लाभले. वेळोवेळी दीपक शिंदे सर, दिनेश दंडगव्हाळ सर आणि रणजीत टकले भर यांनी मदत केली. माझ्या बाईट काळात साथ देणारे आणि सदैव सोबती असणारे माझ्या मुंबईतल्या कॉलेजचे मित्र ‘शार्दुल कचरे ‘स्वप्निल
मोरे’, ‘प्रणित लोहोटे’, शिखर बागडे आणि माझा बालपणीचा मित्र ‘सुमित पाटील’ आणि अमोल पोवार यांना मैत्रीपूर्वक सादर
माझी प्रोफेशनल कारकीर्द सुरू करून देणारा माझा मित्र ‘विशाल औताडे’ याचे खूप खूप आभार! तसेच मयुरेश घार्गे, लक्ष्मण
पळसकर आणि स्वप्निल फड यांचे आभार मानतो.
2026 मध्ये बदलत्या परीक्षापद्धतीत केवळ तथ्यस्मरण पुरेसे नाही; तर विषयांचे सुसंगत विश्लेषण, त्यातील परस्परसंबंध शोधण्याची क्षमता आणि स्वतःचा दृष्टिकोन घडवणे आवश्यक आहे. म्हणून तुमच्या हातातलं हे पुस्तक जर तुमच्या प्रवासाला दिशा देऊ शकलं, तर तेब माझ्यासाठी सर्वात मोठे समाधान असेल. या प्रवासात मीही तुमच्यासोबत आहे!
तुमच्या अभ्यासयात्रेला मनःपूर्वक शुभेच्छा!
आपलाच,
स्वप्निल पाटील
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.