Simplified Chalu Ghadamodi Diary Ank 38th 11 May Te 31 July 2025 Balaji Surane Divya Mahale-Surane

Original price was: ₹220.00.Current price is: ₹154.00.

Author         :      Balaji Surane, Divya Mahale-Surane

Edition         :     38th (2025)

Language ‏   :     Marathi

Publisher  ‎  :     Simplified Publication

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Simplified Chalu Ghadamodi Diary Ank 38th 11 May Te 31 July 2025 Balaji Surane Divya Mahale-Surane

चालू घडामोडींसाठी One Stop Solution.

Balaji Surane, Divya Mahale- Surane

MPSC, UPSC G.K & Current Affairs Book

मनोगत

अल्पावधीतच विद्यार्थीप्रिय ठरलेल्या सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा ’38 वा अंक’ आपल्या हाती देताना मनस्वी आनंद होत आहे. या अंकात 11 मे 2025 ते 31 जुलै 2025 दरम्यानच्या चालू घडामोडींचा आढावा घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल किंवा इतर मंडळां‌द्वारे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा असतील, त्यामध्ये नेमक्या कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यांची काठीण्य पातळी काय असू शकते याचा अंदाज घेऊनच चालू घडामोडींची मांडणी या पुस्तकामध्ये आपण केलेली आहे. नेहमीप्रमाणेच विद्यार्थ्यांनी वेळोवेळी केलेल्या सूचनांचा आदर करून योग्य ते बदल यावेळी सुद्धा करण्यात आले आहेत.

आत्तापर्यंतच्या सर्व आवृत्त्यांना विद्यार्थी मित्रांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.. 38 व्या आवृत्तीलाही आपला तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल यात शंका नाही.

मागील 4-5 वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगा‌द्वारे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडी या विषयाचे विश्लेषण केले असता आपल्याला असे लक्षात येते की, परीक्षा दिनांकापासून साधारणतः दोन वर्षापर्यंतच्या चालू घडामोडींवर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना या बाबींकडेही लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहे. आगामी वर्षभरात होणाऱ्या पूर्व व मुख्य परीक्षांसाठी 1 जानेवारी 2024 पासूनच्या चालू घडामोडींचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. त्यासाठी आपले ‘Simplified Year Book 2025’ तसेच आगामी अंक आपल्याला नक्कीच उपयोगी ठरतील.

स्पर्धा परीक्षेमध्ये उज्ज्वल यश प्राप्त करण्यासाठी चालू घडामोडी हा निर्णायक विषय ठरत आहे. अतिशय महत्वपूर्ण अशा या विषयासाठी आम्ही सखोल, सर्वसमावेशक, परीक्षाभिमुख, अद्ययावत आणि अचूक असा संदर्भ उपलब्ध करून देऊ शकलो यातच आम्हाला धन्यता वाटते.. या पुस्तक निर्मितीमध्ये आम्हाला सर्व प्रकारचे सहाय्य करणारे आमचे मार्गदर्शक डॉ. अजित थोरबोले सर, अभिजित थोरबोले सर तसेच सर्व मित्र मंडळी यांचे आम्ही शतशः ऋणी आहोत..

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.