
Shetikshetratil Pechprasang An Tyache Rajkaran Vivek Ghotale
₹70.00
Author : Vivek Ghotale
Language : Marathi
Publisher : The Unique Academy
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Shetikshetratil Pechprasang An Tyache Rajkaran
शेतीक्षेत्रातील पेचप्रसंग अन् त्याचे राजकारण
विवेक घोटाळे
शेतकऱ्यांच्या व ग्रामीण भागाच्या अवनतीला सरकारी धोरणेही कारणीभूत आहेत. आपली सरकारे शेतीकडे देशाला, उद्योगांना आणि शासकीय योजनांना घर घालून स्वस्तात कच्चा माल पुरविणारी यंत्रणा म्हणूनच पाहत आली आहेत. शेतीत राबणारे म्हणजे देशाचे कायदेशीर वेठबिगार असाच त्यांचा समज झाला आहे. शेतीत राबणाऱ्यांना त्यांच्या श्रमाचे काही शिल्लक ठेवायला पाहिजे, याचा सरकारला सोयीस्कर विसर पडला आहे. सरकार वारंवार बाजारात हस्तक्षेप करून, अनुदानांनी स्वस्त झालेला शेतीमाल आयात करून, निर्यातीवर निर्बंध लादून, शेतीमालाचे भाव सातत्याने पाडत आले आहे. दुष्काळासारख्या आपत्तींचा सामना करण्याचे त्राणही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उरलेले नाही. शेतकऱ्यांच्या लुटमारीला, कर्जबाजारीपणाला व आत्महत्यांना म्हणूनच सरकारची ही धोरणे प्राधान्याने जबाबदार आहेत. शहरकेंद्री, कॉर्पोरेटकेंद्री धोरणांचा पाठपुरावा होतो आहे. शेतकरी, श्रमिक व ग्रामीण विभागविरोधी धोरणांची अंमलबजावणी सातत्याने सुरू आहे. अशी विषमता वाढविणाऱ्या अन्यायकारक धोरणांचा त्याग केल्याशिवाय व समन्यायी पर्यायी विकास दृष्टिकोनाचा अंगीकार केल्याशिवाय हे प्रश्न सोडविता येणार नाहीत, याची जाणीव ही पुस्तिका वाचनात होत राहते.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.