Shambhar Koti Mendu,Donashe koti Hat-A. H. Salunkhe Marathi Book katha-kadambari (Novel) Lokayat (शंभर कोटी मेंदू,दोनशे कोटी हात)
₹100.00 Original price was: ₹100.00.₹85.00Current price is: ₹85.00.
Author : A. H. Salunkhe
Edition : 1 ed 2023
Language : Marathi
ISBN : 9789384091187
Publisher : Lokayat Prakashan लोकायत प्रकाशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Shambhar Koti Mendu,Donashe koti Hat-A. H. Salunkhe Marathi Book katha-kadambari (Novel) Lokayat (शंभर कोटी मेंदू,दोनशे कोटी हात)
मनोगत
संवाद साधण्याची संधी मला मिळत आहे. याचा मला अर्थातच खूप आनंद आहे. खरं तर ‘शंभर कोटी मंद्र, दोनशे कोटी हात’, या माझ्या नव्या पुस्तकाद्वारे आपल्याशी आपण बळीवंश’ आणि सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध’ या माझ्या पुस्तकांची आतुरतेन वाट पहात आहात याची मला पूर्ण कल्पना आहे. ती पुस्तकं मी अजून आपल्या हाती देऊ शकलो नाही याची मला नक्कीच खंत आहे. पण त्या पुस्तकांसाठी संदर्भ मिळवण्याचं काम खूप प्रचंड असल्यामुळे वेळ लागतोय हे आपण समजून घ्याल, असा मला विश्वास आहे. त्या पुस्तकांचे काम करीत असताना जे इतर छोटे-छोटे विचार मनात डोकावतात, तेही अधून-मधून आपल्यापर्व ठेवावेत. या भावनेनं मी या प्रकारचं काही लेखन करीत असतो. माझ्या उपयुक्त पुस्तकांच्या लेखनामधे अशा लेखनानं व्यत्यय येणार नाही, याची दक्षता घेण्याचा प्रयत्न मी करीत असतो, एवढं या प्रसंगी नोंदवून ठेवतो.
आपण जगाकडून सतत काही ना काही घेत असतो. स्वाभाविकच, आपणहो जगाला काही ना काही दिलं पाहिजे. जगाला देण्यासारखं काही तरी आपल्या ठायी निर्मिलं साठवलं पाहिजे. आपण आपल्या अस्तित्वानं जगाला कणभर समृद्ध आणि क्षणभर आनंदी करू शकलो, तरी आपल्या जीवनाचे सार्थक झालं, असं म्हणता येतं. आपली जगाबरोबरची ही देवघेव अन्न, वस्त्र, उपयुक्त वस्तू अशाच कुठल्या तरी मूर्त गोष्टींची असली पाहिजे, असं मात्र नाही. भावना, विचार, प्रेरणा, स्वप्नं यांचोर्स देवघेव करता येते. त्या दृष्टीनं माझा एक अनुभव मुद्दाम नोंदवण्यासारखा आहे. स्पेनमधील बार्सिलोना शहरातील हॉटेलमधे माझ्या नजरेसमोर घडलेला हा प्रसंग आहे. त्या हॉटेलात शेजारी शेजारी तीन लिफ्ट आहेत. तळमजल्यावर लिफ्टचं प्रवेशद्वार भूपृष्ठापासून दीड-दोन फूट उंचीवर आहे. अपंगांची फिरती खुर्ची त्या प्रवेशद्वारापर्यत नेण्यासाठी पायऱ्या नसलेली वेगळी वाट आहे. मी त्या लिफ्टकडं चाललो असताना पायांनी अपंग असलेला एक मनुष्य बॅटरीवर चालणाऱ्या आपल्या खुचर्चीतून वेगारं आला आणि मोठ्या आत्मविश्वासानं त्यानं आपली खुर्ची एका लिफ्टच्या दाराां नेली. लिफ्ट बोलावून घेण्यासाठी त्यानं बटन दाबलं, परंतु लिफ्ट खाली येण्याचा संकेत त्याला दिसला नाही. त्यानं झटकन आपली खुर्ची दुसऱ्या लिफ्टच्या दाराशी नेली, बटन दाबलं आणि लिफ्ट आल्यावर तिच्यात प्रवेश करून चिमणीनं भुर्रकन उडून जावं त्याप्रमाणं तो लिफ्टमधून त्याला हव्या असलेल्या मजल्यावर निघून गेला त्याचं ते आत्मविश्वासी स्वावलंबन पाहून मी थक्क झालो. त्याच्या अपंगपणामुळं त्याच्या विकासावर कोणत्याच मर्यादा पडल्या नव्हत्या, असं भाबडेपणानं मी म्हणणार नाही. परंतु त्या मर्यादांची फिकीर न करता, अपंगपणाचं ओझं न मानता आपले व्यवहा करण्याची त्याची वृत्ती पाहून माझ्या मनात त्याच्याविषयी आदर निर्माण झाला. त्यान माझ्याकडं पाहिलंही नव्हतं, मग त्यानं मला प्रत्यक्षरीत्या काही देण्याचा प्रश्नच नव्हता असं असलं, तरी त्यानं जाता जाता मला जीवनाचं एक मोठं तत्त्वज्ञान दिलं, यात शंका नाही. ज्या व्यक्ती शारीरिक दृष्ट्या अपंग नसतात, त्यांच्याही व्यक्तित्वाच् कुठल्यातरी कोपऱ्यात कधीकधी एखादं मानसिक-भावनिक-बौद्धिक अपंगपण आलेत
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.