

Shabd Aani Shabdkosh (शब्द आणि शब्दकोश)-Niranjan Ghate Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen
₹250.00 Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
Author : Niranjan Ghate
Edition : 1 ed
Language : Marathi
ISBN : 31655
Publisher : Samakaleen Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Shabd Aani Shabdkosh (शब्द आणि शब्दकोश)-Niranjan Ghate Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen
मनोगत
▶ शब्द आणि शब्दकोश हा विषय मी लेखनासाठी का निवडला याचं कारण थोडक्यात सांगणं अवघड आहे.
लहानपणापासून मला वाचनाची आवड होती. जे मिळेल ते वाचायचो. त्यात हाताला शब्दकोश आणि डिक्शनऱ्या लागल्या. त्याही मी वाचून काढल्या. पाचवीत असताना ‘तर्खडकर भाषांतर पाठमाले’शी परिचय झाला. दरवर्षी एक भाग असे या पाठमालेचे तीनही भाग मी पाठ केले होते हे चांगलं आठवतं. मंजीत मला ‘श्यामची आई’च्या चार प्रती भेट मिळाल्या. घरी आधीची एक प्रत होतीच. माझ्या काकांच्या बऱ्याच ओळखी होत्या. त्यांच्या मागे लागून मी त्या प्रतींच्या बदल्यात सोवनींची डिक्शनरी मिळवली.
आमच्या वेळी शाळेत आठवीपासून इंग्रजी हा विषय सुरू होत असे. याच काळात मी इंग्रजी वृत्तपत्रंही वाचू लागलो. त्या वेळी इंग्रजीतले अडलेले शब्द समजून घेण्यासाठी मला वीरकरांची इंग्रजी-मराठी डिक्शनरी मदतीला यायची. ती मी अजूनही जपून ठेवली आहे. त्या बळावरच मी सलग तीन वर्ष इंग्रजीत पहिला येत होतो. पुढे अकरावीची परीक्षा झाल्यानंतर अडीच-तीन महिने काही उद्योग नव्हता. सकाळी ऊन चढेपर्यंत क्रिकेट चाले. मग संध्याकाळी उन्हें उतरल्यावर परत सुरू होई. मधल्या दुपारच्या वेळेत काय करायचं तर वाचन. एका वर्गमित्राच्या भावाकडे पेरी मेसनच्या पुस्तकांचा खजिना होता. तो त्याने माझ्यासाठी खुला केला. त्यातल्या शब्दांसाठीही माझा शब्दकोशशोध सतत सुरू असायचा. पण या अमेरिकी इंग्रजीसाठी आपल्याकडचे शब्दकोश फारसे उपयोगी नाहीत हे लक्षात आलं.
त्यामुळे मी अमेरिकन अर्थ असलेल्या शब्दकोशाच्या शोधात होतो. तोपर्यंत मी संध्याकाळी नोकरी करून पैसे मिळवू लागलो होतो. त्यातून मी वेस्टर्स डिक्शनरी घेतली. त्यात मला हवे ते शब्द तर मिळू लागलेच, पण नवे शोधही लागत गेले. त्यातल्या स्लॅग या विभागाने माझी विकेटच काढली. तिथून पुढे डिक्शनऱ्या जमवण्याचा आणि पुस्तकासारख्या त्या वाचण्याचा छंदच लागला.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.