Amrutfale (अमृतफळे)-G.A.Kulkarni Marathi Book katha-Kadambari (Novel) Continetal
Amrutfale (अमृतफळे)-G.A.Kulkarni Marathi Book katha-Kadambari (Novel) Continetal Original price was: ₹150.00.Current price is: ₹135.00.
Back to products
Kaunteya (कौंतेय) V.V.Shirwadkar Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal
Kaunteya (कौंतेय) V.V.Shirwadkar Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal Original price was: ₹150.00.Current price is: ₹135.00.

Satpudyatil Bhilla (सातपुड्यातील भिल्ल)-Dr Govind Gare Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal

Original price was: ₹350.00.Current price is: ₹315.00.

Author           :    Dr Govind Gare

Edition          :    2 ed 

Language    ‏  :    Marathi

ISBN               :    25074

Publisher      :    Continental Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Satpudyatil Bhilla (सातपुड्यातील भिल्ल)-Dr Govind Gare Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal

मनोगत

प्रदेश महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली भिल्ल ही अतिप्राचीन जमात आहे. महाराष्ट्राशिवाय राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश या राज्यांतही ही जमात प्रामुख्याने आहे. सह्याद्री, सातपुडा, सातमाळा, विंध्य, अरवली, माळवा ह्या पर्वतरांगांचा आणि विशेषतः मध्य भारतातील भिलवाड या नावाने एकेकाळी ओळखला जाणारा प्रदेश हा त्यांचा म्हणून ओळखला जाई. भिल्लांचा इतिहास फार जुना आहे. प्राचीन भारतात भिल्ल हे किरात, निषाद, शबर, भूमिज इत्यादी नावांनी ओळखले जात. राम वनवासात असताना दाण्डकारण्यात त्याला भेटलेली शबरी हीदेखील भिल्लीणच होती. इतिहास काळात भिल्लांची अनेक राज्ये होती. प्रसिद्ध राणाप्रतापांचे राज्य ऊर्जित अवस्थेत आणण्यात भिल्लवीरांचा फार मोठा वाटा होता. भिल्लांचा ऐतिहासिक काळ वैभवाचा असला तरी इंग्रजी सत्तेनंतर त्यांचा काळ खडतर झालेला दिसतो. इंग्रजी सत्तेविरुद्ध त्यांना वारंवार लढावे लागले. इंग्रजी सत्तेला हाताशी धरून भिल्ल प्रदेशात शेठ, सावकार, व्यापारी, जमीनदारांनी मुक्तप्रवेश केला व पुढे भिल्लांचे त्यांनी अतोनात शोषण केले. त्यांच्या जमिनी बळकावल्या, सुपीक प्रदेशातून त्यांना दूर पहाडात व जंगलात ढकलले. भिल्लांचे हे शोषण अनेकांनी पाहिले. भिल्लांच्या दुःखाची कणव येऊन ठक्करबाप्पांनी आपले सारे आयुष्य भिल्लसेवेत घालविले. त्यांच्या सेवेचा वारसा घेऊन पुढे अनेक कार्यकर्ते भिल्ल प्रदेशात सेवाकार्य करू लागले. स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही राजवट सुरू झाली. दबलेला भिल्ल जागा झाला. शोषणाविरुद्ध आवाज उठविण्यास त्यांनी सुरुवात केली. शासन, समाजकार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न करून भिल्लांना शोषणातून मुक्त करण्याचे प्रयत्न चालू ठेवले. त्यातून अनेक चळवळी आणि लढे निर्माण झाले. त्यामुळे शासनाला नवे कायदे करावे लागले. शिक्षणाची सर्व दारे आदिवासींसाठी उघडी करावी लागली. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार वाढला. अनेक सेवाभावी संस्था भिल्ल प्रदेशात सेवाकार्य करू लागल्या. या साऱ्यांचा परिणाम भिल्ल समाज जागृत होण्यात झाला व प्रगतीच्या आणि बदलाच्या दिशेने भिल्ल समाजाने पावले टाकण्यास सुरुवात केली. आजचा भिल्ल बदलला आहे. त्याच्या हक्काची व त्याबरोबरच कर्तव्याची त्याला जाणीव झाली आहे.

भिल्ल समाजाची ही सारी वाटचाल शब्दबद्ध करावी अशी माझी अनेक दिवसांची इच्छा होती. सन १९६८ साली भिल्ल समाजाशी (नवापूर, नंदूरबार, तळोदा या भागात) जंगल कामगार सहकारी सोसायट्यांच्या अभ्यासाच्या निमित्ताने माझा संबंध आला. जंगल कामगार सहकारी सोसायट्यांचा अभ्यास करताना भिल्ल समाजाचे मला फार जवळून दर्शन झाले. त्यातून या समाजाचा भूतकाळ आणि भविष्यकाळ जाणून घेण्याची प्रेरणा मला मिळाली. या प्रेरणेमुळेच गेली ३५ वर्षे हा विषय माझ्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा झाला. तेव्हापासून या समाजाची मिळेल ती माहिती गोळा केली. उपलब्ध साधनांचा अभ्यास केला. प्रस्तुत ग्रंथ लिहिताना ‘पावरा समाज आणि संस्कृती’ लेखक डी.जी.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.