

Sarvsamavesh Buddhimatta Chachani 5500 + PYQ
₹699.00 Original price was: ₹699.00.₹489.00Current price is: ₹489.00.
Author : Dnyandev Warade
Edition : 3rd – 2025
Language : Marathi / English
Publisher : Dnyan Publication
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Sarvsamavesh Buddhimatta Chachani 5500 + PYQ
हे पुस्तक अभ्यासताना वाचकांनी मनी निश्चीत केलेलं ध्येय पुर्णत्वास प्राप्त होवो हीच सदीच्छा !
नमस्कार ,
आज “सर्व सामावेशक बुद्धिमत्ता चाचणी” या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने आपणास परत एकदा भेटताना मी अत्यंत आनंदी आहे या प्रस्तावनेत मी परत एकदा या पुस्तकाचा व माझा जीवन प्रवास थोडक्यात मांडत आहे.
सर्वप्रथम या पुस्तकाच्या पहिल्या दोन आवृत्तींना मिळालेल्या प्रचंड प्रतिसावाबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. 2010 साली मुंबई विद्यापीठातुन MBA (Finance) ची Degree मिळवल्यानंतर 6 महिने बँकेत नोकरी केली परंतु शिक्षण क्षेत्रातील तीव्र ओळीमुळे स्वेच्छेने ही नोकरी सोडून कोचिंग क्षेत्रात पदार्पण केले नोव्हेंबर 2010 ते आजतागायत मी या देवात कार्यरत आहे. फक्त शिकवण्यापूर्वी पुरते मर्यादित न राहता IBPS/TCS याद्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा देऊन यशस्वीरित्या पास देखील केल्या आहेत या मागे हेतु एकच होता की, या आयोगाची प्रश्नपत्रिका समजून घेऊन विद्याव्यर्थ्यांना त्या दृष्टीने अचूक मार्गदर्शन मिळावे आणि विद्यार्थ्यांना सराव व्हावा म्हणून आम्ही परीक्षेत विचारलेले प्रश्न त्याच पद्धतीने स्वतः बनवायचो ज्याला आम्ही “Memory Based Questions” म्हणायचो हे करताना परीक्षा देत असणाऱ्या इतरही विद्यार्थ्यांची मदत घ्यायचो जेणेकरून जास्तीत जास्त प्रश्न विद्यार्थ्यांना अभ्यासाला मिळावेत. विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव अशा सर्व प्रश्नांच मिळून एक पुस्तक बनवलं गेलं ज्याचं नाव “Logical Reasoning Practice Workbook” अस आम्ही ठेवलं त्या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती 2012 साली निर्माण झाली जी दरवर्षी Update होऊन पुन्हा प्रकाशित होत असते उद्देश एकमेव हाच की विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव व्हावा. वर्ष 2021-22 पासून महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सरळ सेवा तसेच इतर शासकीय पदभरती परीक्षा ही IBPS/TCS आयोगामार्फत घेतल्या जातात आणि या परीक्षांची प्रश्नपत्रिका प्रश्नपद्धती समजून घेण्यासाठी मी नुकतीच झालेली TAIT ही परीक्षा दिली ज्यात माझे गुण 174/200 एवढे होते.
ही परीक्षा पद्धती तसेच अभ्यासक्रम पाहून माझ्या लक्षात आले की, महाराष्ट्र शासन व इतर सरळ सेवा किंवा इतरही तस्तम परीक्षा असतील यात अमुलाग्र बदल झालेला आहे. या आयोगांच्या प्रश्न पद्धती व अभ्यासक्रम यातील बदलल्या स्वरूपामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत आणि विद्यार्थ्यांची हि अडचण लक्षात घेता मी IBPS/TCS पेंटर्न वर आधारित मराठी भाषेतील “सर्वसामावेशक बुद्धिमत्ता चाचणी” हे पुस्तक बनवण्याचा निर्णय घेतला आणि पहिली आवृत्ती 2023 साली प्रकाशित केली. पहिल्या आवृत्ती नंतर दुसरी आवृत्ती लगेच प्रकाशित केली पण तिसऱ्या आवृत्तीसाठी थोडा वेळ घेऊन त्यामध्ये भरपूर सराव प्रश्न समाविष्ट केले पहिल्या आवृत्ती मध्ये 3500+ प्रश्न होते आता ह्या आवृत्तीमध्ये 5500+ प्रश्नांचा तुम्हाला सराव होणार आहे.
ते काय म्हणतात ना यासाठीच केला होता का अट्टाहास विद्यार्थ्यांच्या खास मागणीस्तव ही तिसरी आवृत्ती तयार करताना अनेक
आव्हानांना तोंड द्यावे लागले परंतु तुमच्यासाठी काही पण.
आशा आहे हा प्रामाणिक प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडेल आणि आधी इतकाच किंबहुना त्याही पेक्षा जास्त प्रतिसाद मिळेल अशी आशा बाळगतो, हे पुस्तक आपल्या यशाच्या वाटचालीत आपले सारथ्य करो हीच सदिच्छा !
मला खात्री आहे की तुम्ही या पुस्तकाचा पुरेपुर वापर करुन आपले इप्सीत नक्की साध्य कराल. आपल्या पुढील प्रवासासाठी खुपखुप
शुभेच्छा !
आपलाच,
ज्ञान वराडे
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.