Sampurna Police Patil Va Kotwal Bharti Mahasul Sevak पोलीस पाटील (कोतवाल) K sagar Publications
के’सागरीय…..
आगामी वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस पाटील तद्वतच कोतवाल या पदांवर भरती केली जाणे अपेक्षित आहे.
पूर्वी जाहीर केला गेलेला अभ्यासक्रम व पूर्वीच्या परीक्षा यांचा विचार करता या पदासाठी ८० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणे अपेक्षित असून २० गुणांची तोंडी परीक्षा घेतली जाणेही अपेक्षित आहे. लेखी परीक्षा इयत्ता दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार असून त्यामध्ये सामान्यज्ञान, गणित, स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी या विषयांचा समावेश असणे अपेक्षित आहे.
लेखी परीक्षेचा वरील अभ्यासक्रम व तोंडी परीक्षेचे एकूण स्वरूप लक्षात घेता पुस्तकाची रचना ग्रामीण भागातील मुलकी व पोलीस प्रशासन, पंचायतराज, महाराष्ट्र : भूगोल व सामान्यज्ञान, महाराष्ट्रावरील वस्तुनिष्ठ प्रश्न, महाराष्ट्रातील जिल्हे, भारत- भूगोल व सामान्यज्ञान, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य, सामान्य विज्ञान, अंकगणिताची पायाभूत तयारी, चालू घडामोडी या अकरा प्रकरणांत केली आहे. अभ्यासक्रमातील घटक विषय उमेदवारांना मुळातच समजावेत आणि लेखी व तोंडी परीक्षांची त्यांची शंभर टक्के तयारी व्हावी, हा दृष्टिकोन ठेवूनच हे पुस्तक साकारले आहे. पूर्वी घोषित झालेल्या अभ्यासक्रमात बदल होणार नाही असे मी माझ्या अनुभवातून गृहीत धरले आहे.
उमेदवार विद्यार्थिमित्रांना त्यांच्या खात्रीशीर यशाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छांसह !
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065
Reviews
There are no reviews yet.