Sampurna Ganit Solved PYQ Guide 2003 To 2025-Santosh Wattamwar-Chinmay (संपूर्ण गणित)
₹550.00 Original price was: ₹550.00.₹440.00Current price is: ₹440.00.
Author : Pandharinath Rane
Edition : 1 ed 2025
Language : Marathi
Publisher: : Chinmay Publication
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Sampurna Ganit Solved PYQ Guide 2003 To 2025-Santosh Wattamwar-Chinmay (संपूर्ण गणित)
दोन शब्द…
प्रिय विद्यार्थी मित्रांनो…..
MPSC आणि UPSC च्या साधारणतः 2003 ते 2015 या कालावधीत झालेल्या विविध परीक्षांमधील 1500 पेक्षा जास्त प्रश्नांचे प्रकरणानुसार वर्गीकरण व त्यांचे सखोल विश्लेषण पुस्तकरूपाने आपल्या हाती देताना मनस्वी आनंद होत आहे.
या पुस्तकात MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा (CSAT), PSI, STI, ASO, Tax Asst, Clerk, RTO, Forest आणि Engineering Services च्या झालेल्या परीक्षांमधील प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच, UPSC (CSAT) मधील बरेच प्रश्न्न MPSC च्या वेगवेगळ्या परीक्षांना बऱ्याचदा आवृत्तीत झालेले आहेत. ही बाब लक्षात घेवून, UPSC चे जे प्रश्न आयोगाच्या परीक्षेला आवृत्तीत होण्याची शक्यता आहे, अशा प्रश्नांचेही विश्लेषण या पुस्तकात समाविष्ट केलेले आहे.
आपण केलेल्या अभ्यासाचे मोजमाप करण्यासाठी PYQ हे एक सार्थक साधन म्हणून काम करतात व ते आपल्या अभ्यासाची दिशा ठरविण्यासही मदत करतात. आपल्या अभ्यासाला पुर्णत्व देण्यासाठी व स्पर्धात्मक दृष्टीकोनातून प्रश्ঙ্গ कशा पद्धतीने सोडवावेत याचे मार्गदर्शन या पुस्तकातून आपल्याला नक्की होईल, याची मला खात्री आहे.
यातील प्रश्नांची उत्तरे देताना, शक्य तेवढे जास्तीत जास्त विश्लेषण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. शक्य होईल तेवढ्या प्रमाणात सूत्र व समीकरणांपासून दुर ठेवलेले आहे. कमीत कमी वेळेत उत्तरापर्यंत पोहचण्यास आवश्यक पद्धतीनेच उदाहरणे सोडवून दिलेली आहेत. या पुस्तकाच्या आधारे आपण PYQ चा अभ्यास केल्यास आपल्याला अपेक्षित गुण मिळवून यादीत आपले स्थान नक्की मिळवता येईल, याची मी आपल्याला ग्वाही देतो.
उदाहरणाला सोडविताना त्यात दिलेली माहिती, आपल्याला काढावयाची राशी, दिलेली माहिती व काढावयाची राशी यात असणारा संबंध, राशीची किंमत काढताना लागणाऱ्या गणितीय संकल्पना, त्यात असणारी आकडेमोड आणि आवश्यक विचारपद्धती या सर्वांना केंद्रस्थानी ठेवून हे पुस्तक तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक आपल्या ‘यशाच्या मार्गात एक पायरी’ म्हणून काम करो, एवढीच अपेक्षा..!
आपलाच, संतोष वट्टमवार
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.