Sampurna Balmansshastra Va Adhyapanshastra MAHA TAIT (मानसशास्त्र, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र)-Dr. Shashikant Annadate,Swati Shete
के’ सागरीय…
शिक्षण हक्क अधिनियम, २००९ अनुसार शिक्षक म्हणून नोकरी करण्यासाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानुसार केंद्र स्तरावर सीबीएसई संस्थेकडून सीटीईटी परीक्षा व राज्य स्तरावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडन टीईटी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या पेपर एक व पेपर दोन यांमध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे MPSC कडून महिला व बालविकास अधिकारी परीक्षा घेतली जाते, त्यामध्ये बालविकासशास्त्र आणि मानसशास्त्र हे दोन विषय अंतर्भूत आहेत.
सीटीईटी/टीईटी आणि महिला व बालविकास अधिकारी या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे यांनी ‘संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र’ (११ वी आवृत्ती) हा संदर्भ साकारला आहे. प्रस्तुत ग्रंथाच्या यापूर्वीच दहा आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. यावरून या ग्रंथाची विद्यार्थिप्रियता लक्षात येते. डॉ. शशिकांत अन्नदाते यांनी प्रस्तुत प्रस्तुकाची रचना करताना प्रकरणनिहाय माहिती आणि वस्तुनिष्ठ प्रश्न अशी मांडणी केली आहे.
प्रस्तुत ग्रंथाचे लेखन करण्यासाठी श्री. आचार्य-रत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन, मा. अॅड. के. ए. कापसे साहेब, संस्थेचे सचिव मा. मोहन गरगटे साहेब व प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे यांनी प्रोत्साहन दिल्याचे डॉ. अन्नदाते नमूद करतात.
विद्यार्थिप्रिय लेखक डॉ. शशिकांत अन्नदाते यांनी साकारलेला हा ग्रंथ निश्चितच आपणास यशोशिखरापर्यंत घेऊन जाईल.
यशोदायी शुभेच्छांसह !
आपलाच
व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar)
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.comor call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.