

Samakalin Sanskrutik Samiksha समकालीन सांस्कृतिक समीक्षा
₹270.00 Original price was: ₹270.00.₹203.00Current price is: ₹203.00.
Author : Madhuri Dixit
Edition : 2024
Language : Marathi
Publisher : The Unique Foundation
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Samakalin Sanskrutik Samiksha समकालीन सांस्कृतिक समीक्षा
माधुरी दीक्षित
खरे पाहता ‘संस्कृती’ या संकल्पनेची सैद्धान्तिक मांडणी करणं हे तसं अभ्यासकांसाठी एक आव्हानच असतं. कुठल्याही सांस्कृतिक समीक्षेच्या सैद्धान्तिक मांडणीमध्ये सांस्कृतिकदृष्ट्या सूक्ष्म घटकांचा काटेकोरपणे आढावा घेणं आणि या घटकांमधून व्यक्त होणारे बदल अधिक स्पष्टपणे उलगडून दाखवणं अपेक्षित असतंच आणि हेच नेमकेपणानं माधुरी दीक्षित यांच्या लिखाणात दिसतं.
एकीकडे समकालीन म्हणजे चांगल्याची, मूल्यलक्ष्यी विचार-व्यवहारांची वर्तमानातील जाणीव आणि त्याचबरोबर मानवाशी द्रोह करणारी विध्वंसक जाणीवसुद्धा ! प्रस्तुत ग्रंथात माधुरी दीक्षितांचा प्रयत्न समकालीन काळातली अभिव्यक्तीची अनेक (उदा. भाषा, नाटक, खाद्यसंस्कृती, राजकारण, दृश्यप्रतिमा, इ.) रूपं आणि त्यांचा प्रतिगामी आशय अधोरेखित करून आपल्याला उज्वल मुक्तीदायी गोंडस भविष्याचं महत्त्व पटवून देतो. माधुरीनं ‘समकालीन’ या परिस्थितीच्या निमित्तानं घडत जाणाऱ्या चर्चा, विचारविश्वामध्ये सांस्कृतिक क्षेत्रातील साधारणतः नकारार्थी बदलांची संकल्पनात्मक व प्रत्यक्षात किंवा धादांतात घेऊन जाणाऱ्या व्यवहाराची चिकित्सा नैतिक संवेदनेसह केली आहे.
‘समकालीन सांस्कृतिक समीक्षा’ हा ग्रंथ सध्याच्या वैचारिक आणि सांस्कृतिक अरिष्टावर नेमकं बोट ठेवतो. स्वतःच्या आणि सर्वांच्याच मुक्तीचं सूत्र स्वतःच्या हाती घेण्यापेक्षा ते एखाद्या व्यक्तीच्या हवाली करणं, हे एका अर्थानं मानसिक गुलामगिरीचं, वैचारिक हतबलतेचं आणि राजकीय बेफिकीरीपणाचं लक्षण होय. याबद्दलची जाणीव आणि खंत माधुरी दीक्षितांनं लिहिलेल्या ‘समकालीन सांस्कृतिक समीक्षा’ या ग्रंथाच्या सर्व प्रकरणांमधून अतिशय उत्कटतापूर्वक /प्रकर्षानं व्यक्त झाली आहे. त्याबद्दल माधुरीचे अभिनंदन.
Best Novels Book
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.