SAMAJKARYA PARIPEKSHA SAMAJIK SHASTRE ANI KSHETRE (समाज कार्य परिप्रेक्ष्य समाजशास्त्र आणि क्षेत्र)-R.P.Khillare ,Dr.Balaji Munde BOOK MARATHI SET,NET,PET,MPSC,DMER
वर्तमान काळात स्पर्धेच्या जगात स्वतःला यशस्वी करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, निश्चित ध्येय, आणि सतत सराव असेल तर यशस्वी होता येते, परंतु आजच्या काळातील प्रचंड स्पर्धा हे मोठे आव्हान होऊन बसले आहे. यातही कांही ज्ञानशाखांमधे तर तीव्र स्वरूपाची स्पर्धा असलेली दिसून येते. समाजकार्याची ज्ञानशाखाही काही त्यास अपवाद नाही. दरवर्षी हजारो विद्यार्थी या ज्ञानशाखेतून पदवी घेऊन बाहेर पडतात पण प्रत्येकालाच रोजगाराची संधी मिळते असे नाही. त्यात ज्या पदाविधरांना संधीचे सोने करता येते, ते यशस्वी होतात तर इतर हजारो विद्यार्थी या स्पर्धेच्या वर्तुळातून बाहेर फेकल्या जातात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-यांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे दर्जेदार अध्ययन साहित्याचा अभाव. त्यातही समाजकार्यासारख्या पाश्चिमात्य विचारधारेवर आधारीत विद्याशाखेत तर सर्व घटकांचा समावेश असलेली, मराठी भाषेतील आणि वाचकांना सहज समजेल अशा पुस्तकांची उनिवच जाणवते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना समाजकार्य विषयाची अशी विशेष पुस्तके उपलब्ध नाहीत म्हणूनच समाजकार्य विचाराधारेवर आधारित सर्व प्रकारच्या पदांच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी निश्चित उपयोगी पडेल, असे पुस्तक तयार करण्याचा अनेक दिवसांचा मानस होता आणि त्या दृष्टीने संदर्भ पुस्तकांचे वाचन आणि टीपणे काढणेही चालु होते. अनेक दिवसांच्या त्या प्रयत्नांचे पर्यावसान आज प्रस्तुत पुस्तकात होत आहे. प्रस्तुत पुस्तकात समाजकार्याचा पूर्ण अभ्यासक्रम लक्षात घेवुन गरजेनुसार पुस्तकाची मांडणी विश्लेषणात्मक आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात करण्याचा आमचा संपूर्ण पुर्वतायारीयुक्त प्रयत्न आहे. ‘समाजकार्य : संकल्पना आणि पद्धती (भाग १)’ या प्रथम आवृत्ती नंतर समाजकार्य विषयाच्या उर्वरित संपूर्ण अभ्यासक्रमासहीत या दुस-या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.
प्रस्तुत पुस्तकात समाजकार्य आणि संबंधित सामाजिक शाखे व विविध क्षेत्रे आणि इतर संबंधित घटक अंतर्भूत करण्यात आले असून, समाजकार्याशी संबंधित सर्व प्रकारच्या पदांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी सुटसुटीत सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत प्रकरण वाईज मांडणी केली आहे. विविध संदर्भ पुस्तके तसेच विविध परीक्षेत आणि लोकसेवा आयोगांनी विचारलेले महत्वाचे प्रश्न यांचा त्या त्या प्रकरणात समावेश करण्यात आला आहे. सदरील पुस्तकाची मांडणी ही सैद्धांतिक आणि बहुपर्यायी प्रश्न दोन्ही स्वरुपात करण्यात आली आहे. हे पुस्तक या विषयावरील सर्व घटकांचा अंतर्भाव असणारे मराठीतील पहीले
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Reviews
There are no reviews yet.