Samagra Samvidhan-Pankaj Bharti Marathi Book (समग्र संविधान) Madhushree

Original price was: ₹300.00.Current price is: ₹240.00.

Author        :    Pankaj Bharti 

Edition        :     1 ed 2025

Language  ‏ :     Marathi

ISBN            :     9789347457777

Publisher  ‎ :     Madhushree Publication

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Samagra Samvidhan-Pankaj Bharti Marathi Book (समग्र संविधान) Madhushree

मनोगत

हे पुस्तक कागदावर उतरवताना खरेतर जेवढा आनंद आहे तेवढीच शोकांतिकासुद्धा वाटते. संविधान लागू होऊन ७५ वर्षे उलटून गेली तरी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या अर्थासह, जनसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत आपले हे संविधान भारतीय नागरिकांपर्यंत पोहोचू शकले नाही अथवा हेतुपुरस्सर ते पोहोचू देण्यात आले नाही. कदाचित हेच कारण असावे की आजही आपल्या या संविधानाची विटंबना होते, अपमान होतो, ‘संविधान म्हणजे आरक्षण’ असे म्हटले जाते, ‘संविधान कॉपी पेस्ट आहे’ असे म्हटले जाते, काही काही लोकांनी तर या संविधानाने आमच्यासाठी काहीच केलेले नाही आणि हे संविधान बदलवण्यात यावे असे मानण्यापर्यंत मजल मारली आहे. जर मागील ७५ वर्षांत हे संविधान आहे त्या स्वरूपात, सोप्या भाषेत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी दूरदृष्टी ठेवून संविधानातील एक एक तरतूद लिहिली त्याप्रमाणे भारतीयांपुढे आले असते, तर कुणाचीच या संविधानाचा अपमान करण्याची, विटंबना करण्याची आणि त्याबाबत अपशब्द बोलण्याची हिंमतच झाली नसती. माझे हे लिखाण, पुस्तक संपूर्ण संविधान सर्वसाम ान्यांपर्यंत कमीत कमी शब्दात आणि सोप्या भाषेत पोहोचवण्यासाठीच आहे. या पुस्तकात माझा मागील ८ वर्षांचा संविधानाचा पूर्ण अभ्यास तुमच्यापुढे मांडलेला आहे; ज्यात संविधानातील एकूण एक कलम, एकूण परिशिष्टे, संविधानाचा एकूण इतिहास आणि आजपर्यंत संविधानात करण्यात आलेल्या जवळजवळ सर्व घटनादुरुस्त्या हे सर्व वाचता येणाऱ्या सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत आणि कमीत कमी शब्दात समाविष्ट आहे.

भारताच्या मूळ संविधानाचा आधार घेऊनच हे पुस्तक लिहिण्यात आलेले आहे. माझे हे लिखाण पुस्तकाच्या स्वरूपात आपल्या सर्व अभ्यासू वाचकांपर्यंत आणण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक बंधुभगिनींकडून प्रेरणा आणि पाठबळ मिळाले. त्या सर्वांचा उल्लेख येथे करणे मला गरजेचे वाटते. आयु. सचिन तुपरे (आयर्लंड), आयु. प्रवीण कावरे (आयर्लंड), सौ. अलका झेंडे (पुणे), आयु. दिनेश सुरडकर (अकोला),

Available at Ksagar Book Centre Granth

www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.