Samagra Marathi Vyakran (समग्र मराठी व्याकरण) -Dr. Leela Govilkar K Sagar

Original price was: ₹335.00.Current price is: ₹235.00.

Author         :  Dr. Leela Govilkar / K’Sagar

Edition         :  11TH -2023

ISBN             :  

Language  ‏  :  Marathi

Publisher: ‎ :  K’sagar Publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Samagra Marathi Vyakran (समग्र मराठी व्याकरण) -Dr. Leela Govilkar K Sagar

के’सागरीय…

अलीकडील काळात अगदी ग्राममहसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, भूकरमापक, पोलीस कॉन्स्टेबल, कृषिसेवक, आरोग्यसेवक, तुरुंग रक्षक, आरोग्य सेवक, लिपिक, लिपिक-टंकलेखक यांसारख्या तृतीय श्रेणीच्या परंतु महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांपासून ते उद्योग निरीक्षक (उद्योग संचालनालय), तांत्रिक सहायक (विमा संचालनालय), दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क), करसहायक गट क, लिपिक टंकलेखक गट क या पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षांपर्यंत आणि आणखी वरच्या स्तरावरील गणल्या गेलेल्या सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक (श्रेणी-१) वा मुद्रांक निरीक्षक, दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क), तांत्रिक सहायक, कर सहायक आदी पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षांपर्यंत मराठी व्याकरण हा विषय महत्त्वाचा आणि अनिवार्य ठरला आहे.

मराठी व्याकरण विषयाचे हे महत्त्व लक्षात घेता या विषयासाठी या सर्व परीक्षांचा एकत्रित व साकल्याने विचार करून आणि त्याचवेळी अभ्यास-क्रमास पुरेपूर न्याय देणाऱ्या व परीक्षांच्या सतत बदलणाऱ्या प्रश्नधतींचा विचार करून रचना केलेल्या संदर्भाची गरज अधोरेखित होते.

डॉ. लीला गोविलकर या अहिल्यानगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयातून निवृत्त झालेल्या मराठीच्या प्राध्यापिका. अनेकांना त्यांनी मराठी विषयात विद्यावाबरपतीसाठी मार्गदर्शन केलेलं, यावरून त्यांचा मराठी विषयातील अधिकार ध्यानी यावा, भाषाविज्ञान, समीक्षा, वाङ्मयाचा इतिहास व व्याकरण यांबरोबरण व्यावहारिक मराठीवरही त्यांचं तितकंच प्रभुत्व.

जे जे आपणासी ठावे ते ते नेटकेपणाने तर्कशुद्धतेचे भान ठेवून इतरांशी सांगावे। हे त्यांचे तत्ल, खरे तर, या तत्वाता अनुसरूनच त्यांनी मराठी व्याकरण विषयावरील ‘सम मराठी व्याकरण’ या प्रस्तुत संदर्भचिं लेखन कार्य शिरी घेतलेलं अन् तितक्याच जबाबदारीने अन् समरसतेन पार पाडलेल त्यांच्या व्यासंगी लेखणीनं अन् अभ्यासू वकिलाक वृत्तीनं विषयाला पूरेपूर न्याय दिलेला या पंथाच्या पानापानांतून, वाक्यावाक्यांतून अन् शब्दाशब्दांतून मराठी व्याकरणावरील त्यांचे प्रभुत्व प्रतीत व्हावं अन् विद्यार्थी मित्रांना हा रुक्ष विषय सोपा वाटावा, आकलित व्हावा अन् या विषयाचा अभ्यास त्यांना त्यांच्या परीक्षेत उत्तम यश मिळवून देण्यात उपयुक्त ठरावा, या सार्थ अपेक्षेसह हा छोटासा पण ज्ञानान ओथंबलेला परिपूर्ण संदर्भ आपल्या हाती सोपविताना कृतकृत्यतेचा सार्थ आनंद होत आहे.

आपला,

व्ही. एस. क्षीरसागर

(K’Sagar)

Available at Ksagar Book Centre or onwww. ksagaronline.com or call on 9545567862

Additional information
Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.