

Rough Sketches (रफ स्केचेस)-Subhash Awchat Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen
₹400.00 Original price was: ₹400.00.₹320.00Current price is: ₹320.00.
Author : Subhash Awchat
Edition : 1 ed
Language : Marathi
ISBN : 24697
Publisher : Samakaleen Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Rough Sketches (रफ स्केचेस)-Subhash Awchat Marathi Book katha-kadambari (Novel)
मनोगत
▶ खरं तर मी कमर्शियल आर्टिस्ट, पण शिक्षण घेण्याआधी आणि नंतरही माझा ओढा चित्रकलेकडेच होता. कमर्शियल काम भरपूर केलं, पण रमलो चित्रांमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे रंग ही जशी माझ्या अभिव्यक्तीची आपसूक भाषा होती, तसेच शब्दही. कदाचित घडणीचा मोठा काळ लेखक-कवींसोबत वावरल्यामुळे असं घडलं असावं.. माहीत नाही!
काही भावना चित्रांमधून बाहेर येऊ शकतात, काही शब्दांमधून. त्यामुळे दोन्ही माध्यमं तशी आवडीचीच. पण चित्रं काढण्याच्या नादात माझं लिखाण जवळपास थांबून गेलं होतं. २००५मध्ये माझं ‘स्टुडिओ’ पुस्तक प्रसिद्ध झालं, त्यानंतर बराच काळ काहीच लिहिलं गेलं नाही. अध्येमध्ये कुणी मित्रांनी आग्रह केल्यामुळे एक-दोन भुरकट लेख लिहिले असतील तेवढेच. बाकी मनातलं लेखन म्हणावं तर शून्य.
आणि बऱ्याच वर्षांनी एके दिवशी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी रविवारच्या पुरवणीत सदर लिहा, असा प्रस्ताव ठेवला. लोकसत्ताच्याच एका कार्यक्रमात मी लावलेली गोष्टी अन् किश्शांची लड ऐकून त्यांना ही कल्पना सुचली असावी. माझी पहिली प्रतिक्रिया ‘छे, हे आपल्याला जमणारं नाही’ अशीच होती. असं कुणी तरी सांगून, ठरलेल्या दिवशी, दर आठवड्याला लेख लिहून देणं वगैरे आपला पिंड नव्हे. मग उगीच
कशाला त्या फंदात पडा, असं माझं मन मला सांगत होत. पण कुबेरांनी आग्रह लावून घरला, तसं म्हटलं, ‘बर बुवा! एखादा लेख लिहन बघु यात.’
लिहायला लागलो आणि लक्षात आलं, आपल्या डोक्यात अशा अनेक कल्पना आहेत ज्या चित्रांमधून व्यक्त करता येत नाहीत. अनेक फॉर्ममधून बाहेर आलेल्या नाहीत. आयुष्यात गोष्टी आहेत, ज्या आजवर कुठल्याच वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं, देशा-परदेशांतले प्रवास, तिथले चित्रकार, त्यांची चित्रं, त्यामागचा त्यांचा विचार, फिलॉसॉफी असं किती, काय काय.. ज्याबद्दल मी आजवर फारसा कुणाशी बोललेलोही नाही. लिहिणं तर लांबच.
एकदा लिहायला लागल्यावर मजा यायला लागली. सुरुवात झाली ती माणसांपासून. तात्या माडगूळकरांपासून पुलंपर्यंत, तर्कतीर्थांपासून ते शांताबाईंपर्यंत, सुर्वेपासून आरती प्रभूपर्यंत, शशी कपूरपासून ओशोंपर्यंत किती तरी माणसं.. लिहिण्याच्या निमित्ताने जाणवलं, माझ्यातला केवढा मोठा भाग या माणसांनी व्यापलाय । केवढं दिलंय त्यांनी मला! त्यांच्याबद्दल लिहिणं म्हणजे पुन्हा त्यांच्याबरोबर जगून घेण्याचा आनंदच !
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.