Rang Maza Vegla – रंग माझा वेगळा-Suresh Bhat (NOVEL) BOOK KATHA-KADAMBARI Kavita Sangrah

Original price was: ₹150.00.Current price is: ₹128.00.

Author         :    Suresh bhat 

Edition         :   12 ed 

Language  ‏  :    Marathi

Publisher  ‎ :    Sahitya Prasar Kendra

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Rang Maza Vegla – रंग माझा वेगळा-Suresh Bhat (NOVEL) BOOK KATHA-KADAMBARI Kavita Sangrah

कवितेच्या प्रवासातील प्रत्येक मुक्काम म्हणजे नव्या मुशाफिरीचा आरंभ असतो, हे वास्तव मला माझ्या सुदैवाने फार पूर्वीच गवसले आणि म्हणूनच काव्यलेखनाच्या बाबतीत मी माझ्या सिद्धीचा दावा करू शकत नाही. ‘प्रसिद्धी’ म्हणजे सिद्धी नव्हे! आधी साधना, नंतर सिद्धी आणि शेवटी आपोआपच प्रसिद्धी मिळते.

कवीच्या बाबतीत ही सिद्धी म्हणजे आपण पंचेंद्रियांनी जे अनुभवतो आणि आपल्या प्रज्ञेने जे समजून घेऊन त्याबद्दल निष्कर्ष काढतो, ते सर्व रसायन अचूक व प्रत्ययकारी शब्दांत व्यक्त करण्याची क्षमता होय.

मला येथे स्पष्टपणे हेही सांगायचे आहे की, कोणत्याही कवीच्या भविष्याचा फैसला, तो ज्या भाषेत काव्यलेखन करतो; ती भाषा बोलणारी सामान्य जनता करीत असते. आणि जर सामान्य मराठी जनतेच्या ठायी रसिकता नसती, तर आजही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ज्ञानेश्वरीवर रसाळ प्रवचने का बरे झाली असती?

अजून एक महत्त्वाचा मुद्दा ज्याला कविता वापरते, तोच कवी! आणि जो कवितेला वापरतो, त्याला फारतर हुशार व यशस्वी इसम म्हणता येईल. मग अशा इसमांचे ‘कालखंड’ ठरतात – पंचवार्षिक किंवा फारतर दशवार्षिक! कवी तर काळ ओलांडून पुढे जात असतो !

आता थोडे माझ्याविषयी माझी मातृभाषा मराठी आहे, ह्याचा मला कृतिशील अभिमान वाटतो. मी जे काही जीवन जगलो, त्यावरून मी एवढेच नम्रपणे पण ठासून सांगतो की, माझी मायबोली किती समृद्ध, किती समर्थ आणि किती प्रेमळ आहे; ह्या वास्तवाचा मी प्रत्यय घेतलेला आहे. आणि ह्याबाबत मी स्वतःला धन्य समजतो.

मराठी भाषासुद्धा महाराष्ट्राच्या सर्व भागांत राहणाऱ्या सामान्य मराठी माणसांकडूनच शिकायची असते. एरवी, आईच्या दुधाची सर ‘इंम्पोर्टेड मिल्क पावडर’ करूच शकत नाही. सर्व भाषांकडून घेण्यासारखे सर्वकाही घ्यावे; पण आपण मराठी भाषा मराठी सारखीच बोलली व लिहिली पाहिजे.

शेवटी – फक्त मेण शिल्लक असेपर्यंतच मेणबत्ती जळज-जळत फार तर खोलीभर मंद प्रकाश देते. आणि मेण वितळून गेल्यानंतर ती आपोआप विझते. मात्र सूर्य कधीही विझत नसतो, फार तर काही काळापुरता नजरेआड होतो (मावळतो)! ज्याने त्याने आपआपला फैसला करावा !

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

 

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.