Rajyashastrachi Olakh राज्यशास्त्राची ओळख

Original price was: ₹270.00.Current price is: ₹203.00.

Author            :      Prof. Dattatray Vabale ,  Prof. Namdev Pawar

Edition           :      2025

Language       :     Marathi

Publication    :    The Unique Foundation

 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Rajyashastrachi Olakh राज्यशास्त्राची ओळख

(F.Y.B.A. Semester I & II)

प्रा. दत्तात्रय वाबळे प्रा. नामदेव पवार

ज्ञानप्राप्तीसाठी अभ्यासक्रम आणि त्याच्याशी सुसंगत पाठ्यपुस्तके (Text Books) असणे आवश्यक असते. शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत पाठ्यपुस्तके ही ज्ञाननिर्मिती सोबतच सार्वजनिक दृष्टिकोन आकारास येण्यासाठीचे मूलभूत साधन असते. पाठ्यपुस्तकांचे महत्त्व व आवश्यकता लक्षात घेऊन ‘युनिक फाउंडेशन प्रकाशना’ मार्फत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP-2020) अभ्यासक्रमास लागू होणारी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) बदललेल्या अभ्यासक्रमानुसार आणि नवीन पॅटर्ननुसार काही पुस्तके प्रकाशित करीत आहोत. या प्रकल्पाचाच भाग म्हणून ‘राज्यशास्त्राची ओळख (परिचय)’ हे पुस्तक आकाराला आले आहे.

राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. सुहास पळशीकर यांच्या मते, ‘तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्र यात राज्यशास्त्राचे मूळ सापडते. म्हणूनच प्लेटोच्या विचारांमध्ये प्रथम राजकीय मूल्यांविषयीचा विचार सापडतो असे मानले जाते. चांगला समाज निर्माण करून व्यक्तीचे हित/कल्याण साधणे हे राजाचे/राज्याचे उद्दिष्ट मानून प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञांनी राजकीय संघटनेचा विचार केला. अॅरिस्टॉटलनेही नीतिशास्त्र आणि राजकीय मूल्यविचार याचा एकत्रितच विचार केला. प्लेटो आणि अॅरिस्टॉटल यांचे तत्त्वचिंतन हा राज्यशास्त्राचा आरंभबिंदू मानल्यास राजकीय तत्त्वचिंतनाची परंपरा जवळपास अडीच हजार वर्षांएवढी प्रदीर्घ आणि जुनी ठरते. अॅरिस्टॉटलच्या अभ्यासाला तत्त्वचिंतनाखेरीज प्रत्यक्ष तत्कालीन राजकीय संघटनेच्या अभ्यासाची जोड मिळाल्याने आजच्या राज्यशास्त्राचे जनकत्व त्याच्याकडे असल्याचे मानले जाते.’

पुस्तकाची वैशिष्ट्ये

NEP – 2020 च्या बी.ए. राज्यशास्त्र अभ्यासक्रमानुसार

प्रात्यक्षिकासंबंधी मार्गदर्शन

घटकानुसार सरावासाठी प्रश्न

सुलभ भाषेत आशयपूर्ण मुद्देसूद मांडणी

संदर्भ ग्रंथांचा वापर

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.