Raje Umaji Naik Marathi Book katha-kadambari (Novel) राजे उमाजी नाईक-Suraj Madane
₹350.00 Original price was: ₹350.00.₹280.00Current price is: ₹280.00.
Author : Suraj Madane
Edition : 2026
ISBN : 9788199602175
Language : Marathi
Publisher : RUDRA Publishing House
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Raje Umaji Naik Marathi Book katha-kadambari (Novel) राजे उमाजी नाईक-Suraj Madane
प्रस्तावना
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा केवळ १८५७ नंतर सुरु झालेल्या चळवळीपुरता मर्यादित नाही. अखंड हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात उठलेले पहिले सशस्त्र बंड, छत्रपती शिवाजी महाराजांना आपले प्रेरणास्थान माणून हिंदवी स्वराज्याप्रमाणे स्वातंत्र्याचे स्वप्न बाळगून जंगल-दऱ्यांतून दिलेला लढा आणि अन्यायाविरुद्ध पेटलेली चैतन्याची ज्योत यांचे मूर्त रूप म्हणजे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आजवर प्रामुख्याने काही मोजक्या व्यक्तींभोवती केंद्रित राहिला आहे. परंतु या इतिहासाच्या कडेकपारीत, जंगलदऱ्यांत, समाजाच्या हृदयात आणि अन्यायाविरुद्ध पेटलेल्या असंतोषात जन्माला आलेल्या अनेक क्रांतिकारकांचे योगदान अद्याप पुरेसे प्रकाशात आलेले नाही. आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हे अशाच एका महान, पण इतिहासाने दुर्लक्षित केलेल्या योद्ध्याचे नाव आहे.
ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभं राहण्याचे धैर्य त्या काळात केवळ शस्त्रबळाचे नव्हते, तर ते सामाजिक बहिष्कार आणि अमानवी व्यवस्था यांना नाकारण्याचे धैर्य होते. राजे उमाजी नाईक यांचा संघर्ष हा केवळ इंग्रजांविरुद्ध नव्हता, तर तो शोषणाविरुद्ध, सामाजिक अन्यायाविरुद्ध आणि माणसाच्या स्वाभिमानासाठी होता. म्हणूनच त्यांचे बंड हे जितके राजकीय होते, तितकेच सामाजिक आणि मानवी मूल्यांशी जोडलेले होते. त्यांनी स्वातंत्र्यासाठी जिवाची आहूती दिली आणि इतिहास जिवंत केला म्हणूनच राजे उमाजी नाईक हे पहिले हुतात्मा, आणि खरे आद्यक्रांतिवीर ठरतात.
या पुस्तकाचे महत्त्व यासाठी अधिक आहे की, ते राजे उमाजी नाईक यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करताना केवळ घटनांची नोंद करत नाही, तर त्या घटनांमागील सामाजिक वास्तव, समाजाचा संघर्ष आणि त्या काळातील इतर क्रांतिकारकांची भूमिका यांचाही सखोल वेध घेते. इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी केवळ सत्ताधाऱ्यांच्या नजरेतून न पाहता, संघर्ष करणाऱ्या समाजाच्या नजरेतून पाहण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पुस्तकात दिसून येतो.
या पुस्तकातून वाचकाला केवळ एका क्रांतिकारकाचा इतिहास नहे, तर भारतीय समाजाच्या संघर्षाचा, वेदनेचा आणि परिवर्तनाच्या आकांक्षेचा इतिहास समजून घेता येतो. म्हणूनच हे पुस्तक विद्यार्थी, संशोधक, शिक्षक तसेच समाजाच्या भवितव्याबद्दल संवेदनशील असलेल्या प्रत्येक वाचकाने आवर्जुन वाचावे. असे मला मनापासून वाटते. आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे कार्य अधिक व्यापकपणे जगभर पोहोचावे, त्यांच्या विचारांना योग्य स्थान मिळावे आणि इतिहासाचा हा दबलेला आवाज पुन्हा बुलंद व्हावा, या सदिच्छेसह या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
– सुनिल शिवाजी जाधव (सचिव)
आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक संघ, मामलेदार कचेरी, पुणे २
Available at Ksagar Book Centre Granth
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.