Railway ALP Prashnapatrika Sanch (रेल्वे)-Divya Ghadage,Anil Ghadage
₹320.00 Original price was: ₹320.00.₹224.00Current price is: ₹224.00.
Author : Divya Ghadage,Anil Ghadage
Edition : 2025
Language : Marathi
Publisher : Railway Premi Marathi Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Railway ALP Prashnapatrika Sanch (रेल्वे)-Divya Ghadage,Anil Ghadage
प्रस्तावना
प्रथम आवृत्तीच्या निमित्ताने..
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो ……
अनिल घाडगे Sr. Assistant Loco Pilot Indian Railway
रेल्वे ALP (ASSISTANT LOCO PILOT) साठी मराठीतून हे पहिले व एकमेव पुस्तक.
रेल्वे प्रेमी मराठी प्रकाशन या प्रकाशनामार्फत आपण दर्जेदार व परिक्षाभिमुख साहित्य उपलब्ध करुन देत असतो, यातील पुढचे पाऊल म्हणजेच हे पुस्तक होय.
हे पुस्तक नक्कीच रेल्वे परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी महत्वाचे ठरणार आहे, कारण रेल्वेमध्ये पाठीमागील प्रश्नपत्रिकेला खूप महत्त्व आहे. रेल्वेच्या प्रत्येक Exam मध्ये पाठीमागील प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि Type पुन्हा-पुन्हा येत असतात. रेल्वे ALP विषयी सर्व माहिती मी पुढे दिलेली आहे. रेल्वेच्या सर्व Exam साठी हे पुस्तक उपयुक्त आहे. रेल्वेमध्ये Select व्हायचे असेल तर प्रश्नपत्रिकेच्या सरावाशिवाय पर्याय नाही.
सध्या रेल्वेच्या Exam कडे मुलांचा वाढता कल दिसून येत आहे. पण त्यांना मराठीमध्ये साहित्य (पुस्तके, नोट्स, पेपर) उपलब्ध नसल्याकारणाने त्यांना अभ्यास करत असताना बऱ्याच अडचणी येत आहेत. रेल्वेच्या सर्व परिक्षा या मराठी भाषेत होत असतानाही मराठीमध्ये दर्जेदार व परिक्षाभिमुख साहित्य (पुस्तके, नोट्स, पेपर) भेटणे खूप गरजेचे आहे. या सर्व गोष्टीचा विचार करुन मी या पुस्तकाच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न करत आहे.
कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी अनेकांचा हातभार लागणे अपेक्षित असते, हे नाकारुन चालणार नाही. यात प्रथम मोलाची साथ म्हणजे माझे प्रेरणास्थान ‘आई-वडीलां’ची असेल. तसेच माझे बंधू ‘अमोल घाडगे’ व माझी पत्नी ‘दिव्या घाडगे’ यांचाही या पुस्तकाच्या तयारीत मोलाचा वाटा आहे.
मार्गदर्शक संजय रेगुडे सर (PSI), विठ्ठल काकडे सर, समीर मुलाणी सर, श्रीकांत पाटील सर, सागर करे सर, महेश जाधव सर, प्रतिक बाबर सर या सर्वांचे अभार मानण्यापेक्षा यांच्या ऋणात राहणे पसंत करेल. या पुस्तकासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे मनःपुर्वक आभार.
आपल्या प्रत्येकाच्या यशामध्ये या पुस्तकाचा वाटा असेल याची हमी देतो.
आपणा सर्वांना उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!!
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
| Language |
|---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.