Aapulaki (आपुलकी)-P.L.Deshpande Marathi Book katha-kadambari (Novel)
Aapulaki (आपुलकी)-P.L.Deshpande Marathi Book katha-kadambari (Novel) Original price was: ₹250.00.Current price is: ₹213.00.
Back to products
KhogirBharti (खोगीरभरती)-P.L.Deshpande Marathi Book katha-kadambari (Novel)
KhogirBharti (खोगीरभरती)-P.L.Deshpande Marathi Book katha-kadambari (Novel) Original price was: ₹200.00.Current price is: ₹170.00.

Purchundi (पुरचुंडी)-P.L.Deshpande Marathi Book katha-kadambari (Novel)

Original price was: ₹300.00.Current price is: ₹255.00.

Author           :        P.L.Deshpande 

Edition          :        17 ed

Language    ‏  :        Marathi

Publisher    ‎  :        Mouj Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Purchundi (पुरचुंडी)-P.L.Deshpande Marathi Book katha-kadambari (Novel)

बालपणात जर शाळा नसती तर सर्वांच्याच बालपणाचा काळ सुखाचा झाला असता. सुटी सक्तीची आणि शिक्षण ऐच्छिक असावं असं माझं मत आहे. याचा अर्थ मला शिकायची हौस नव्हती असं मुळीच नाही. पण आंबे पिवळे कसे होतात? नारळात गोड पाणी ओततो कोण? गाभुळलेली चिच झाडावर तयार कशी होते? दिवसभर आपण गाणी म्हटली तर काय होईल? याचं शिक्षण द्यायचं सोडून बाकीचेच विषय शाळेत शिकवले जात. रोज प्रार्थना करूनही देव आपल्याला गणितात मार्क देताना इतका दुष्ट कां होतो? – या माझ्या प्रश्नाचे उत्तर मला शाळेत कधीच मिळालं नाही. तरी बरं, माझ्या लहानपणी जुनं गणितच होतं. गणपती, मारुती वगैरे जुन्या देवांना नवं गणित येत नसेल, पण जुनं गणित शिकलेल्या देवांना तोंडी हिशेबाची उत्तरं माझ्या कानांत हळूच येऊन सांगायला काय हरकत होती? माझ्या वर्गातल्या विनायक देसायाला दिनू आणि मोहन वागळ्याला मात्र तो ही उत्तरं नक्की सांगत असणार. वास्तविक आम्ही तिघंही जोगेश्वरीच्या, रामेश्वराच्याच देवळातल्या देवाचं चांगलं घंटा वाजवून, लक्ष वेधून घेऊन, साष्टांग नमस्कार करून, “देवा, गणितात मला पास कर. पुस्तीवर शाई सांडू दे नको.” अशा मागण्या मांडत होतो. देवानं काही बाबतीत माझ्याशी फारच पार्थ्यालिटी केली होती. आपल्याला हवं ते दुसऱ्याला मिळणं याला आम्ही पार्थ्यालिटी म्हणत होतो.

माझं बालपण-म्हणजे सुमारे आठ वर्षांचा मी होईपर्यंतचं आयुष्य मुंबई शहरात, अंधेरीनजिकच्या जोगेश्वरीत गेलं. माझा जन्म मुंबईतल्या गावदेवी भागातल्या किर्पाळ हेमराजच्या चाळीत झाला. पण सुमारे पंचावन्न-छपन्न वर्षांपूर्वी गावदेवी, गिरगाव वगैरे भागांतल्या चाळीचाळींतून राहणाऱ्या काही कारवारकर लोकांनी मुंबई उपनगरांत जाऊन राहायचे म्हणून अंधेरीजवळ जोगेश्वरीला सहकारी घरबांधणी केली. त्या वेळी जोगेश्वरीचं रेल्वेस्टेशनसुद्धा नव्हतं. मात्र ही हाउसिंग सोसायटी, हल्ली एकेका इमारतीत दहादहा पंधरापंधरा बिऱ्हाडं राहतात किंवा दहादहा पंधरापंधरा मजल्यांच्या इमारती असतात तसली नव्हती. चार बिऱ्हाडांना एक एकमजली टुमदार घर-तीन खोल्या. पुढं छोटंसं अंगण, मागं परसू. अशी ही वसाहत स्थापन करणाऱ्यांपैकी माझे आजोबा हे एक होते. ‘ऋग्वेदी’ ह्या नावानं त्यांनी ग्रंथही लिहिले आहेत. ह्या वसाहतीचं नाव होतं,

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.