Punyashlok Ahilyadevi Holkar Pranav Patil Marathi Book katha-kadambari (Novel)-Krishna पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

Original price was: ₹999.00.Current price is: ₹799.00.

Author           :   Pranav Patil 

Edition          :   2025    

Language    ‏  :   Marathi

ISBN               :   9788194975021

Publisher      :  Krishna Publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Punyashlok Ahilyadevi Holkar Pranav Patil Marathi Book katha-kadambari (Novel)-Krishna पुण्यश्लोक अहिल्यादेवी

प्रस्तावना

अहिल्यादेवींच्या मार्गावर…

२०२५ हे वर्ष अहिल्यादेवींच्या जयंतीचे त्रिशताब्दी वर्ष म्हणून भारतभर साजरे केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी पुण्यात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र’ या संस्थेची स्थापना झाली. त्या कार्यक्रमाला एक श्रोता म्हणून मी हजर होतो. याच कार्यक्रमाच्या दरम्यान अहिल्यादेवींवर एक गौरव ग्रंथ प्रकाशित करावा अशी कल्पना पुढे आली. त्या वेळी या ग्रंथाची जबाबदारी घेण्याचे मी अगदी सहजपणे स्वीकारले खरे पण प्रत्यक्षात हे काम किता आव्हानात्मक आहे, हे माझ्या लक्षात आले. पहिला टप्पा होता, विषय-निश्चितीचा! पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनचरित्रातील ज्ञात आणि अज्ञात पैलूंवर प्रकाश पडावा, या दृष्टीने मी विषयांची निवड केली. त्या त्या विषयातील तज्ज्ञ अभ्यासक संशोधक यांच्या गाठीभेटी घेतल्या, संदभाँची यादी तयार करून ती मिळवली, संदर्भ साहित्याचे फक्त वाचन न करता मूळ संदर्भाचा धांडोळा घेऊन त्यांचा तटस्थ राहून अभ्यास सुरू केला. या अभ्यासाचा प्रस्तुत ग्रंथाच्या संपादनासाठी जसा उपयोग झाला, तसाच तो भारताचा पूर्व – आधुनिक काळ समजून घेण्याकामीही झाला.

ऐतिहासिक साधनांच्या प्रकाशात

अहिल्यादेवींच्या कारकिर्दीनंतर वीस-पंचवीस वर्षांनी माळव्यात आलेल्या जॉन माल्कम या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या कानावर अहिल्यादेवींचे नाव सतत पडत होते, त्यामुळे माल्कमने चिकित्सकपणे या विषयातली माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने अहिल्यादेवींच्या सहवासात राहिलेल्या, त्यांना पाहिलेल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्याने लिहून ठेवले आहे की, ‘अहिल्याबाईंच्याबद्दल मी जितकी जास्त चौकशी करतो, तितकी त्यांच्या विषयीची समाजातील श्रद्धा मला जाणवते.’ या संदर्भातला एक प्रसंग माल्कमने १८३२ साली प्रकाशित केलेल्या त्याच्या ‘Memoir of Central India Including Malwa’ या पुस्तकात दिला आहे. त्याचे भाषांतर असे,

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.