Pu. Shi. Rege Yanchi Samagra Kavita (पु. शि. रेगे यांची समग्र कविता)-Sudhir Rasal Marathi Book katha-kadambari (Novel) Kavita Sangrah

Original price was: ₹1,500.00.Current price is: ₹1,275.00.

Author           :      Pu. Shi. Rege Pu.Sudhir Rasal

Edition          :       1 ed 

Language    ‏  :       Marathi

ISBN               :      9788194871460

Publisher      :      Popular Prakashan 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Pu. Shi. Rege Yanchi Samagra Kavita (पु. शि. रेगे यांची समग्र कविता)-Sudhir Rasal Marathi Book katha-kadambari (Novel) Kavita Sangrah

पु. शि. रेगे यांनी शब्दमाध्यमाच्या विविध अंगांच्या द्वारा व त्याच्या विविध प्रकारच्या संघटनांच्या द्वारा काही कवितांतून विविध तन्हांनी, परिमाणांनी, अंगांनी व्यामिश्र झालेली लय चैतन्य पूर्णतेने, सहजतेने, एकात्मतेच्या पातळीवर व्यक्त केलेली आहे. तिचे स्वरूप आजवर व्यक्त झालेल्या आवर्तनी लयीपेक्षा वेगळे आहे. रेगे यांना केवळ अर्थाच्या दिशेनेच काव्यात्म नव्या शब्दांची जाणीव नव्हती; तर त्यांना शब्दांतील व शब्दसंघटनांतील विविध लयशक्यतांचीही व शक्तीचीही जाणीव होती.

मराठी कवितेचा विचार करताना त्यांच्या कवितेतील या अनोख्या लयात्मतेचा विचार कुणी समीक्षकाने केलेला दिसून येत नाही. आज घडीला त्यांच्या कवितेतील लयीच्या प्रयोगशीलतेचा विचार होणे अतिशय अगत्याचे आहे. एक तर रेगे यांच्या कवितेचा असर आज मराठी कवितेवर आहे हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या कवितेतील एकूणच लयीचे चैतन्य आज जर मराठी कवितेने आत्मसात केले; निदान कवींनी ते समजून घेतले तर गेल्या दशकातील मराठी कवितेची जी प्रतिमायुक्त गद्यात्मतेच्या आणि खोट्या सूचकतेच्या दिशेने घसरण सुरू झालेली आहे ती थांबून तिला सच्च्या कवितेचे रूप लाभण्यास या अंगापुस्सी तरी मदत होईल असे वाटते.

-आनंद यादव

(अनुष्टुभ, जुलै-ऑगस्ट १९७८)

संस्कृत-प्राकृतपासून चालत आलेल्या काव्यपरंपरेशी जरी पु. शि. रेग्यांनी आपल्या कवितेचे नाते जोडले असले तरी कवितारूपासंबंधीचा जो आधुनिक विचार आहे तोही रेग्यांनी आपला बनवला. किंबहुना आपल्या काव्यनिर्मितिद्वारे मराठी कवितेत तो त्यांनी रुजवला. कविता फक्त ‘कविता’च असली पाहिजे, कवितेचा आकृतिबंध आणि कवितेची भाला अन्य वाङ्मयरूपांपेक्षा आणि भाषारूपांपेक्षा भिन्न आहे; वाङ्मयक्षेत्रात दिइस स्वतःचे कार्य असल्यामुळे अन्य भाषारूपांकडे स्वाभाविकपणे असलेली कामे तिने आपल्या शिरावर घेऊ नयेत, हे पथ्य त्यांनी आपल्या निर्मितीत कटाक्षाने पाळले. आपल्या कवितेला त्यांनी मिळवून दिलेले विशुद्ध रूप त्या रूप त्यांनी शेवटपर्यंत सांभाळले. म्हणून नवकविता घडवण्यान्या देगाचे ते मर्डेकरांच्या बरोबरीचे मानकरी ठरतात.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.