Pratikultetun Yashakade (प्रतिकूलतेतून यशाकडे)-P.M.Alegaonkar Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

Author           :   P.M.Alegaonkar   

Edition          :   1 ed

Language    ‏  :   Marathi

ISBN               :   9788174211811

Publisher      :   Continental Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Pratikultetun Yashakade (प्रतिकूलतेतून यशाकडे)-P.M.Alegaonkar Marathi Book katha-kadambari (Novel) Continetal

प्रास्ताविक

संघर्ष यशासाठीच-

राह्यला घर कसलं. घोड्यांचा तबेला. त्या तबेल्यात उंच अर्ध्या माळ्यावर घोड्यांसाठी साठवलेलं वाळलेलं गवत. त्याच्याच शेजारच्या अर्ध्या जागेत त्याचं ते घर. सगळं कुटुंबच त्या अर्ध्याशा माळ्यावर राहायचं. त्या घराला ना दारं ना खिडक्या ! पाणीबिणी कशाची सोय नाहीच. वरती चढून जाण्यासाठी बांबूची जुनाट डुगडुगणारी चार-पाच पट्ट्यांची शिडी. किती गरिबी !! एखाद्-दुसऱ्या पावाच्या तुकड्यावर दिवस काढायचा.

तो मुलगा सकाळीच उठून, कसल्याशा आकाराची बेढब पँट घालून, अर्धवट लोंबणाऱ्या बाह्यांचा शर्ट घालून, दोन्ही बगलांत हात लांब करून-वर्तमानपत्रांचे भले मोठे गड्ढे घेऊन त्या काळच्या इंग्लंडच्या तशा निर्जन रस्त्यातून घरांच्या दारांकडे बघत झपाझप चालत जात असे. ते इंग्लंड शहरही इ.स.१८०२-०३ चे कमीच गर्दीचे ! त्याचं पेपर्स टाकणं मोठं विचित्रच होतं. तो सकाळीच घरोघरी पेपर्स नेऊन देई. दिवसभरात लोक ते पेपर्स वाचत असत. संध्याकाळी तोच मुलगा घरोघरी जाऊन ते पेपर्स गोळा करून परत आणत असे. (पेपर्स विकत घेऊन वाचायला परवडलं पाहिजे ना?) म्हणून तर पेपर्सच्या मालकाची ही युक्ती… तो मालकच त्या पेपरांचे रद्दीचं दुकानही चालवत असे. शिवाय त्या दुकानात पुस्तकांची बांधणी, शिलाई अशी दिवसभराची कामं चालू असत.

हा छोटा मुलगा त्या बुक बाइंडरकडेच कामाला होता. अत्यंत हुशारीनं, शांतपणे आणि वेळेवर सर्व काम जबाबदारीने करत असे. त्याच्यासमोर अनेक पुस्तकं बांधणीला येत असत. एकदा त्याच्यासमोर ‘एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका’ आले. त्याला तर खजिनाच मिळाला. तर एकदा प्रा. श्रीमती मारसेट यांचे ‘कॉनव्हर्सेशन ऑन केमिस्ट्री’ हे पुस्तक समोर आले. मि. अँबे यांच्या त्या दुकानात तो रमूनही गेला. पुस्तकांचे वाचन आणि त्यातले प्रयोग तो प्रत्यक्ष करून पाहू लागला… तो त्याचा आवडता छंद झाला !

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.