Prathamik Shishyavrutti Pariksha Kluptya Ani Sutre Std -4 th – Paper-2 Engraji va Buddhimatta -Pandharinath Rane (Scholarship)-Narmada
₹220.00 Original price was: ₹220.00.₹176.00Current price is: ₹176.00.
Author : Pandharinath Rane / पंढरीनाथ राणे
Edition : 4 ed 2025
Language : Marathi
Publisher : Narmada Prakashan / नर्मदा प्रकाशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Prathamik Shishyavrutti Pariksha Kluptya Ani Sutre Std -4 th – Paper-2 Engraji va Buddhimatta -Pandharinath Rane (Scholarship)-Narmada
विद्यार्थी मित्रांनो,
मनोगत…
शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षा ही आयुष्यात पुढे येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा पाया आहे ती पापा भक्कम करण्यासाठीच “क्लुप्त्या सूत्रे” या मार्गदर्शिकेची निर्मिती केली आहे शिष्यवृत्ती परीक्षेतील अध्या तयारी पूर्ण क्षमतेने झाली तरच विद्यार्थी मित्रांना परीक्षेत सहजरित्या यश प्राप्त होते आणि राज्य गुणवत्ता यादीत त्यांचे नाव झळकते एकविसाव्या शतकातील संगणकाच्या आणि नॅनो टेक्नोलॉजीच्या युगात वावरताना प्रत्येकाला यशस्वी होण्यासाठी विजेच्या वेगाने धावणे अत्यावश्यक बनले आहे. हा वेग गाठण्यासाठी सरावातील सातत्य, सोप्या सोप्या क्लुप्या आणि स्याद्वारे वेग व अचुकतेची सांगड घातली जाते. हे सर्व आपल्या हाती “क्लुप्त्या सूत्रे” या मार्गदहिंकितून सोपवत आहोत.
महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी २०२६ पासून घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ४थी (प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा) व इयत्ता ७वी (उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा) इयत्तेसाठी निश्चित केली आहे.
भावी जीवनातील उच्च व बदलते शिक्षण याचा पाया मजबूत करण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. व्यावहारीक जीवन जगताना इंग्रजी भाषा ही मातृभाषेइतकीच महत्त्वाची आहे. काळाची पावले ओळखून गणित बुद्धिमत्ता चाचणी हे विषय इंग्रजी माध्यमातून सुरू झाल्यावर शिष्यवृत्ती परीक्षांसाठी पुस्तकांची गरज निर्माण झाली. त्याद्वारेच शिष्यवृत्तीची मार्गदर्शक पुस्तके आपल्या हाती सुपूर्द करीत आहोत या पुस्तकांच्या अध्ययानातून प्रज्ञावान चाणाक्ष हुशार बुद्धीमान व अभ्यासू विद्यार्थ्यांचा परीक्षेत कस लागून निकोप स्पर्धेचे वातावरण निर्माण होईल.
“क्लृप्त्या व सूत्रे” या पुस्तिकेत नावाप्रमाणेच अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक, उपघटक, मुद्देनिहाय महत्त्वाच्या घटकांची माहिती, नमुना उदाहरण स्पष्टीकरणासह उत्तरे नमुना उदाहरणावर आधारित सरावासाठी बहुआयामी आदर्श उदाहरणे प्रत्येकाची अचूक उत्तरसूची या सूत्रबद्ध मांडणीने रचना केली आहे शालेय अभ्यासातील क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच इतर स्पर्धा परीक्षांना उपयुक्त घटकही यावर्षीच्या अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट केले आहेत. त्याची रचना सुटसुटीत सोप्या पद्धतीने मुलांना समजेल अशा पद्धतीने केली आहे. एकच प्रश्न वेगवेगळ्या विविध पद्धतीने या पुस्तकात सोडवून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना गणित हा अवघड क्लिष्ट वाटणारा विषयही हसता खेळता होतो. तर भाषा विषयातील व्याकरणाचे प्रत्येक नियम अचूक व दररोजच्या व्यवहारातील उदाहरणासह समाविष्ट केले आहेत. शब्दसंपत्ती वरील विस्तृत व ओघवत्या शैलीतील माहिती आपणास भाषेवर प्राविण्य मिळविण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांनाही निश्चितच मदत करेल
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची दर वर्षी प्रश्न विचारण्याची बदलणारी शैली विचारात घेऊन संभाव्य प्रश्नांचा समावेश प्रत्येक घटकाच्या मुद्देसुद माहिती नंतर केला आहे.
“स्वयं-अभ्यास, आवश्यक अचूक माहितीचा संग्रह व वेळेच्या नियोजनातून अभ्यासातील सातत्य” हा स्पर्धा परीक्षेतील यशाचा मंत्र आपल्या पर्यंत पोहोचविणे हाच या मार्गदरिकिचा मुख्य हेतू आहे. तो आपल्या हातात-मनात पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा नेहमीच असतो. या मार्गदर्शिकच्या अभ्यासाने गुणवत्ता यादीतील क्रमांक निश्चित होण्यास मदत ही मार्गदर्शिका करेल. “क्लृप्त्या आणि सूत्रे” पंढरीनाथ राणे, लिखित नर्मदा प्रकाशनाची पुस्तके हे सूत्र प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अचूक माहिती नमुना प्रश्न-भरपूर सरावांसाठीची उदाहरणे अचूक उत्तरांसह आपल्या समोर ठेवली आहेत. याद्वारे आपण यशाच्या वाटेतील धनी व्हावे ही आमची प्रमाणिक अपेक्षा आहे.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
| Publication House | |
|---|---|
| Language |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.