English Vocab Guru By Ganesh kad
English Vocab Guru By Ganesh kad Original price was: ₹360.00.Current price is: ₹252.00.
Back to products
The Upsc Prelims Key Prayaas
The Upsc Prelims Key Prayaas Original price was: ₹1,100.00.Current price is: ₹850.00.

Prashaskacha Dharma Ethics, Integrity And Aptitude

Original price was: ₹540.00.Current price is: ₹378.00.

Author         :      Arun Adsul

Edition         :     2025

Language  ‏  :     Marathi

Publisher:  ‎ :    The Maharashtra Prabodhini Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Prashaskacha Dharma Ethics, Integrity And Aptitude

आपल्या आतल्या मार्गदर्शकाशी (आत्मा) कसलीही प्रतारणा न करता केलेले कर्तव्य पालन किंवा जबाबदारी पालन यालाच धर्म असे म्हणतात. याच अर्थाने पुस्तकाच्या शीर्षकात याचा वापर केलेला आहे. प्रतारणा टाळण्यासाठी व्यक्तीने आपल्यात असणाऱ्या पशुत्वावर पूर्ण नियंत्रण करणे अत्यावश्यक असते, त्यासाठी आपल्या प्रत्येक निर्णयात व्यवहारिक शहाणपणा दाखवावा लागतो. कारण – निर्णय हेच कृतीचे कारण असते.

आयुष्याची दिशा ही ज्याची त्याची निवड असते. समाजात वावरताना प्रत्येकाने आपल्या भूमिकेची निवड आपला स्वाभाविक कल (Aptitude) आणि अंगभूत प्रतिभेला (Talent) पूरक करणे अपेक्षित असते. व्यक्तीने ज्या भूमिका नैसर्गिक असतात त्या न टाळता समाजातील भूमिकेची निवड विचारपूर्वक करावयाची असते. दूसरा पर्याय नाही म्हणून नाईलाजाने कोणतीही भूमिका स्वीकारणे /निवडणे आत्मिक समाधानापासून वंचित ठेवते. मानसिक समाधानापेक्षा आत्मिक समाधानाच्या अपेक्षेने जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक निवडलेली भूमिका आत्मिक समाधानाच्या माध्यमातून जीवनाला अर्थपूर्ण करतात आणि नैतिक बैठक देतात, त्यामुळेच व्यक्ती आधिप्रमाणित (Authentic) आयुष्य जगते.

ज्यांना प्रशासकीय कला अवगत आहे किंवा ज्यांचा स्वाभाविक कल प्रशासनाकडे आहे त्यांची आवड / इच्छाशक्ती त्यांना प्रशासकाच्या निवडीपासून थांबवूच शकत नाही, कारण दूसरा पर्याय उपलब्ध नव्हता म्हणून सदर व्यक्तीने भूमिका-प्राप्तीसाठी प्रयत्न केलेले नसतात. प्रत्येक भूमिकेकडून काही कर्तव्य पालन आणि काही जबाबदाऱ्यापालन अपेक्षित असते. अंतःप्रज्ञेच्या प्रकाशात सदर बाबींचे पालन करणे म्हणजेच भूमिकेचा धर्म पालन अंतः प्रज्ञेच्या प्रकाशात व्यक्तीकडून अनैतिक कार्य होऊच शकत नाही.

प्रशासकाने आपली भूमिका पार पाडताना अंतः प्रज्ञेचे मार्गदर्शन घेतले पाहिजे हे सांगण्याचाच या पुस्तकामागील मूळ उद्देश आहे. प्रशासकाला भूमिका निभावताना काही अधिकारही बहाल केलेले असतात. सदर अधिकार प्रशासन-प्रक्रियेचा एक भाग असतो. अधिकारांचा वापर प्रशासकाने न्याय्य पध्दतीने करणेच अपेक्षित असते. नागरी सेवकाने नागरिकांना सेवा देताना काल्पनिकरित्या नागरिकाच्या भूमिकेतून विचार करणे म्हणजेच मानवतेला हाक देणे असा होतो.

आपल्या कामाकडे कोणाचेही लक्ष / पाळत नसताना प्रशासकाने भूमिका-धर्म पाळणे म्हणजेच सचोटी. आज अस्तित्वात असणारी परिस्थिती फारच चिंताजनक आहे याचाही उहापोह करण्यात आलेला आहे.

डॉ. अरुण अडसूळ

(मा. सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

About brand
The Maharashtra Prabodhini Prakashan