Prachin Geet Manjusha (प्राचीन गीत मंजूषा)-N. G. Joshi Marathi (novel) Book katha-kadambari

Original price was: ₹400.00.Current price is: ₹340.00.

Author         :     N. G. Joshi

Edition         :     2 ed

Language ‏   :      Marathi

Publisher  ‎  :      Mouj Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Prachin Geet Manjusha (प्राचीन गीत मंजूषा)-N. G. Joshi Marathi (novel) Book katha-kadambari

शावेश्वरपूर्वकालीन गोरक्षनाथांपासून अलीकडच्यापर्यंतच्या सुम एकशे सत्तर कमीची एकूण चार सदतीस गीत प्रस्तुत ‘प्राचीन गीतमंजू मध्ये डॉ० ना० पर जोशी यांनी संकलित संपादित केली आहेत. प्रत्येक कवीचे व बहुतेक सर्व गीतांचे वैशिष्टय सांगणाऱ्या टिपा, पहिल्या ओळीची सूची वगैरे परिशिष्टे आणि ‘मध्ययुगीन मराठी काव्य एक (वेगळे) विश्लेषण’ हा पन्नास पृष्ठांचा प्रदीर्थ प्रास्ताविक लेख यांमुळे ही प्राचीन गीते वाचकांना आकलनसुलभ झाली आहेत.

वारकरी, नाथ, रामदासी इत्यादी पंथांतील कवीची व शाहिरांची गीते येथे आहेतच, पण महानुभाव, जैन, लिंगायत, गुजरातीभाषी, मुसलमान, ख्रिस्ती, स्त्रिया, अनाम कची इत्यादीच्या गीतांना मराठी संकलनात येथे प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने स्थान मिळाले आहे.

डॉ० जोशी यांनी संपादिलेल्या व १९५९ साली ‘मौज’तर्फे प्रकाशित झालेल्या ‘प्राचीन गीतभांडारा ‘पेक्षा हा संग्रह अधिक मोठा असून संतांच्या कूटगीतांना दिलेले भरघोस प्रतिनिधित्व हे या ‘मंजूषे’चे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

डॉ० ना० ग० जोशी (जन्म इ०स० १९११-मृत्यू १९८६) यांनी आयुष्याच्या प्रारंभीच्या वर्षांमध्ये कोकणात आंजर्ले व महाड परिसरात लोकगीते, स्त्रीगीते, भजने, कीर्तन, तमाशे इत्यादींमधून प्राचीन मराठी गीतांचे संस्कार घेतले. कॉलेजशिक्षण, राष्ट्रीय विद्यालयात आठ वर्षे अध्यापन आणि कॉलेजात पंचवीसहून अधिक वर्षे मराठीचे अध्यापन ही त्यांची कारकीर्द गुजरातमध्ये भावनगर-अमदाबाद-बडोदे येथे घडलेली; त्यामुळे त्यांच्या वाङ्मयविषयक दृष्टिकोणात व्यापकता आणि उदारता आली, ‘मराठी छंदोरचना (लयदृष्ट्या पुनर्विचार)’, ‘मराठी छंदोरचनेचा विकास’ व ‘तुलनात्मक छंदोरचना’ हे-महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते व ‘मौज’ने प्रकाशित केलेले-ग्रंथ ही मराठी काव्यसमीक्षेतली त्यांची नजरेत भरणारी कामगिरी. ‘कविता’ (स्फुट कवितांचा संग्रह) व ‘जीवनयोग’ (खंडकाव्य) ही त्यांच्या गंभीर काव्यप्रतिभेची साक्ष देणारी पुस्तकेही ध्यानात घेतली म्हणजे ‘प्राचीन गीतभांडार’ व प्रस्तुत ‘प्राचीन गीतमंजूषा’ यांमध्ये दिसणाऱ्या विचक्षण काव्य-जाणिवेचे नवल रसिकांना वाटणार नाही!

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.