Police Bharati Granth Samanya Gyan-Rupeshkumar Rawat Sai Jyoti

Original price was: ₹799.00.Current price is: ₹519.00.

Author        :     Rupeshkumar Rawat 

Edition        :     1st- 2025

Language ‏   :    Marathi

Publisher   ‎ :    Sai Jyoti Publication

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Category:
Description

Police Bharati Granth Samanya Gyan-Rupeshkumar Rawat Sai Jyoti

लेखकाचे मनोगत

पोलीस भरती पंच (भाग-1) सामान्य ज्ञान हा नवीन अभ्यासक्रमावर आधारीत तसेच गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकेवर आधारित संशोधनपर संदर्भ विद्यार्थ्यांच्या हाती देतांना अत्यंत आनंद होत आहे. पोलीस भरतीच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कमीत कमी किती अभ्यास करावा तर निश्चित यश मिळेल?, अभ्यास कसा करावा? अभ्यास कोठून करावा यासारख्या प्रश्नांचे उत्तरच या संदर्भप्रथात दडलेले आहे. परीक्षा कोणतीही असो, पेपर सेट करणारी व्यक्ती अभ्यासक्रम व गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका समोर ठेऊनच प्रश्न सेट करत असते त्यामुळे कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना मागील 8 ते 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकेतूनच अभ्यास केल्यास यश मिळण्याची शक्यता अधिक असते असा लेखकाचा अनुभव आहे. बहुपर्यायी प्रश्नांच्या बाबतीत प्रत्येक प्रश्नातील दिलेल्या चारही पर्यायाबद्दलची संपूर्ण माहिती घेणे अत्यावश्यक असते कारण प्रश्न रिपीट होत नसला तरी पुढच्या परीक्षेला विचारलेल्या प्रश्नाच्या आजूबाजूच्या माहितीवर आधारित किंवा चार पर्यायापैकी विचारलेल्या पर्यायाला वगळून इतर पर्यायावर प्रश्न विचारण्याची शक्यता असते. कोणत्याही परीक्षेत आतापर्यंत काय विचारले आहे, विचारलेल्या प्रश्नांचा ट्रेंड काय आहे आणि पुढे काय विचारण्याची शक्यता आहे याचा अचूक अंदाज आला की अभ्यास करुन यश संपादन करणे खूप सोपे होते.

हा संपूर्ण संदर्भग्रंथ चार भागात असून इतर तीन भाग लवकरच प्रकाशित होणार आहे. आपणासाठी शक्य तितका परीपूर्ण संदर्भग्रंच बनवल्याने लेखकाला खूप आनंद होत आहे. पोलीस भरतीच्या मागील दहा वर्षांच्या सर्व जिल्ह्याच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिकांची पहिली आवृत्ती ही तुमच्या पोलीस भरती पंथ (भाग-1) सामान्य ज्ञान संबंधित सर्व समस्यांचे वन-स्टॉप सोल्यूशन आहे कारण त्यात लेखकाने सर्वात प्रामाणिक आणि अचूक स्पष्टीकरण दिलेले आहेत. शिवाय या संदर्भग्रंथात 2016 ते जून 2025 मध्ये विचारलेल्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे.

कोणत्याही परीक्षार्थीने सध्याच्या ट्रेंडनुसारच त्याच्या तयारीचे धोरण आखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लेखकाने आपणासाठी हे करून तुमचे काम सोपे केले आहे आणि त्यानुसार योग्य धोरण आखले आहे. या आवृत्तीमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक विचारलेल्या प्रश्नावर अधिक विस्तृत माहिती दिली आहे. अलीकडील ट्रेंड असे सूचित करतात को प्रश्नांचे स्वरूप सतत बदलत आहे. अंतिम गुणवत्तेसाठी सामान्य ज्ञान मध्ये चांगला स्कोअर केला तर पोलीस भरती परीक्षा पास करणे सोपे जात असल्याने सामान्य ज्ञान विषयाला अतिशय महत्व आहे.

प्रस्तुत कार्याचे उत्कृष्ट वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे तपशीलवार स्पष्टीकरण आहे आणि परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांच्या ट्रेंडनुसार अतिरिक्त संबंधित माहिती देखील प्रदान केली आहे. या कार्यामध्ये संशोधनावर आधारित तथ्ये आणि माहितीचा दुर्मिळ संग्रह आहे, जो अन्यचा अनेक स्रोतांमध्ये विखुरलेला आहे. सरावासाठी मागील 10 वर्षात पोलीस भरतीच्या परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा समावेश व स्प्ष्टीकरणात अतिरिक्त परिक्षाभिमुख माहितीचा समावेश केलेला आहे.

वेगवेगळी बरीच पुस्तके वाचण्यापेक्षा मागील परिक्षेत विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे दिलेल्या स्पष्टीकरणातूनच वेळेची बचत करुन परिक्षेची तयारी करता यावी व कार्यक्षमता वाढवून परिक्षेत अधिक गुण मिळविणे सोपे जावे हा लेखकाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. पोलीस भरतो ग्रंथ (भाग 1) सामान्य ज्ञान उच्च दर्जाचा संदर्भग्रंथ म्हणून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांस याचा अमूल्य उपयोग होईल असा विश्वास आहे.

साई ज्योती पब्लिकेशनचे प्रकाशक आणि त्यांच्या टीमने हे पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त करुन लेखकाच्या लेखनकार्याला सन्मान मिळवून दिला त्याबद्दल लेखक त्यांचे मनःपूर्वक आभारी आहे.

सर्व सूचनांचे स्वागत आहे.

सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरीता असंख्य शुभेच्छा!

धन्यवाद!

रुपेशकुमार राऊत

Available at Ksagar Book Centre Granth

www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.