Police Bharti 103 Prashnapatrika Sanch
Police Bharti 103 Prashnapatrika Sanch Original price was: ₹599.00.Current price is: ₹420.00.
Back to products
English Vocab Guru By Ganesh kad
English Vocab Guru By Ganesh kad Original price was: ₹360.00.Current price is: ₹252.00.

Parikshabhimukh Marathi Vyakran Amol Patil B.N.Academy

Original price was: ₹400.00.Current price is: ₹280.00.

Author        :   Amol Patil

Edition        :  2 ed 2026

Language ‏  :   Marathi

Publisher   :  B.N.Academy

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Parikshabhimukh Marathi Vyakran Amol Patil B.N.Academy

प्रस्तावना

आजवर मरातीची अनेक व्याप आहेत अगदी संस्कृत पंडितांपासून तर मरातीच्या अभ्यासकांपर्यंत अनेकांनी आपापली वेगवेगही मौदविली आहेत त्यामुळे हा विषय म्हणजे मतमतांतरांबला असे व्याचे स्वरूप झाले आहे. कुष्णात प्रमाण गानाने हा गायक अभ्यासकांच्या गोरया गंभीर प्रत्र होऊन बसला. त्यामुळे भाषावार प्रांतरवनेत मराठी भाषेया आधारावर निर्माण झालेल्या महाराष्ट्र शासनाने एक धाडसी पाऊल उचलले, ते म्हणजे एक तज्ज्ञ समिती गठित करून त्यांच्यावर व्याकरणाचा लसावी काढण्याची जबाबदारी सोपवली, समितीने सुचवलेले नियमहाजनाने मराठी व्याकरणाचे दिशादर्शक नियम म्हणून मान्य केले. या नियमांना धरूनच मराठी भाषा लिहिली जावी असे संकेत आहेत.

महाराष्ट्रातील मराठी मुले-मुली मोठ्या प्रमाणात विविध स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करतात यात व्याकरणहा किचकट विषय असतो. तो विद्याथ्यांसाठी आव्हानास्पद असतो, त्यांच्या समस्यांचे अचूक निदान व्हावे यासाठी श्री. अमोल पाटील यांनी ‘परीक्षामिमुख मराठी व्याकरण’ या ग्रंथाची निर्मिती केली, ही त्यांची कृती अत्यंत स्तुत्य आणि नव्या पिढीला उपकारक आहे कारण बाजारात अतिशय गंभीर चुका असलेली पुस्तके सर्रास विकली जातात आणि विद्यार्थिदेखील तीच हाताळतात. त्यामुळे परीक्षेत त्यांना अपेक्षित यश प्राप्त होत नाही, सदोष पुस्तकांच्या यादीत नामांकित लेखक-प्रकाशक आहेत हे विशेष. त्यामुळे विद्यार्थिला कुणीतरी त्यापासून परावृत्त करणेदेखील गरजेचे आहे. अमोल पाटील यांनी सर्व बाबींचा साकल्याने विचार करून हे उत्तम असे पुस्तक तयार केले आहे. याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. वर्णविचार, विचार आणि वाक्यविचार या तिन्ही घटकांचा तपशीलाने वेध घेतला आहे. त्यायोगे लिपी, भाषा, व्याकरण, बाँचे उद्यान, जोडाक्षरे, संधी-विग्रह, नागांचा लिंगविचार, विभति विचार, विशेषणे, सामासिक शब्दचारी वाक्यकरण विन्हव्यवस्था यांची असंख्य उदाहरणांसह विस्तृत मांडणी केली आहे. साहित्यशालीय अंगाने भाषेचा विचार करताना अभिधा-लक्ष्णा-व्यंजना या शब्दातीची उदाहरणे त्यांनी प्रस्तुत केली आहेत. रसविचाराचादेखील ऊहापोह ते करतात. म्हवजेच स्पर्धा परीक्षेसाठी असलेल्या आवश्यक घटकांचा त्यांनी पात परामर्श घेतला आहे. हे उघडच आहे.

मानवी जीवनव्यवहारात भाषा हे संदेशवहनाचे प्रभावी माध्यम आहे. प्रत्येक भौगोलिक क्षेत्रात राहणारा जनसमुदाय संपर्कसाठी कोणत्या ना कोणत्या भाषेचा वापर करतो, भाषा ही परिवर्तनशील आहे. प्रवाही आहे. त्यामुळे शास्त्रशुद्ध नियमांच्या चौकटीत तिला बंदिस्त करता येत नाही. तिचा प्रवाह सभोवतालचा परिसर सजीव करीत असतो, प्रत्येक भाषेची नियमययवस्था असते. ती अपरिवर्तनीय अजिबात नसते. त्या-त्या व्यवस्थेलाच आपण व्याकरण असे म्हणतो, व्याकरण हे भाषापेक्ष असते. भाषा बदलली की तिचे व्यावहारिक रूपही बदलते. मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आहे. मराठी भाषेच्या प्रवाहात तिच्या असंख्य बोलीचे महत्त्व विशेष आहे. या बोली म्हणजे तिचे खरे स्वरूप आहेत, तेच तिला जीवनदान देतात, प्रमाणभाषा हे केवळ भाषेचे सोयीचे रूप असते. गंमत म्हणजे किंवा दुर्दैव म्हणा आपण प्रमाणभाषेच्या व्याकरणावरच लक्ष केंद्रित केले, खरे तर सर्व बोलीच्याही व्याकरणाचे प्रमाण व्याकरणापेक्षा वेगळेचही असणार, स्या स्या बोलीची व्याकरण अभ्यासकांनी सिद्ध करायला हवीत, आज जागतिकीकरणाच्या अवडंबरात मराठीचा जीव गुदमरतो आहे, बोलीमधून बोलणाऱ्यांना तुच्छतेने बघितले जाते. त्यामुळे गावागावांमध्येच येणाऱ्या मराठीच्या मनात न्यूनगंड निर्माण होती. या कारणाने मराठीचे फार मोठे नुकसान झाले आहे. बोलींकडे पाठ फिरवून केवळ प्रमाण मराठीच्या नादी लागणान्यांनी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, ‘बोली संपल्या तर मराठी भाषा संपेल,’ स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमातही बोलींना आग्रक्रमाने प्राधान्य देण्याची गरज आहे. जेणेकरून केवळ प्रमाणभाषेच्या व्याकरणाचा अभ्यास न करता विविध बोलीच्याही व्याकरणाचे महत्त्व वाढीस लागेल.

प्रमाण मराठीच्या व्याकरणाचा अभ्यास अमोल पाटील यांनी या पुस्तकात सुरेख पद्धतीने केला आहे. विशेषत्वाने यात भरपूर उदाहरणे दिली आहेत. व्याकरणिक संकल्पनांचा सुलभतेने परिचय करून दिला आहे, महत्याच्या व्याकरणकारांच्या ग्रंथांचा आधार घेऊन त्या संदर्भग्रंथांची यादीही उपलब्ध करून दिली. जेणेकरून जिज्ञासू विद्याथ्यांना ते मुळापासून तपासून बघता येतील अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे हे पुस्तक लक्षणीय झाले आहे.

महाराष्ट्रात मराठी भाषेवर या ना त्या कारणांनी अनेक आक्रमणं होत आहेत, याबाबत सगळेच चिंतेत आहेत. मराठीच्या वाढविकासात अनेकजण आपापले योगदान देतच आहेत. पण, तरीही ही कोंडी फुटत नाही, अत्यंत संपन्न, प्रगल्भ आणि रसाळ असुनही मराठीची गंगा संथ लयीत का वाहते? याच्या अनेक कारणांपैकी एक प्रमुख कारण युवावर्ग मराठी भाषेपासून दुरावतो आहे, हे एक आहे. त्याला इंग्रजी सोपी वाटते आणि मराठी कठीणा इंग्रजीप्रमाणे मराठी ही ज्ञानभाषा (थोड्याफार कमीअधिक प्रमाणात) असूनही तरुणाईचे तिच्यापासून पलायन चिंताजनक आहे. तरुण पिढी हाच राष्ट्राचा पुढील समर्थ आधार असतो. पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे तेच कर्तव्यपराङ्‌मुख होतील तर कसे चालेल त्यामुळे अमोल पाटील यांचे मला मनापासून कौतुक करावेसे वाटते. त्यांनी तरुणाईला मराठी भाषा-व्याकरणाचा अतिशय सोप्या पद्धतीने परिचय करून दिला आणि एक आदर्श सदर्भकोशच उपलब्ध करून दिला. त्यांच्या या प्रयत्नामुळे युवा पिढीला मराठी भाषेच्या अधिक समीप येण्यास मदत होईल,

डॉ. श्री. सुनील रामटेके

प्राध्यापक व विभागप्रमुख

पदव्युत्तर मराठी विभाग,

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई

लेखक : अमोल पाटील

परीक्षाभिमुख मराठी व्याकरण

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

B.N.Academy
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

About brand
B.N.Academy