Avani T1 (अवनी T1)-Vikramsinh Patil Marathi Book katha-kadambari (Novel) New Era
Avani T1 (अवनी T1)-Vikramsinh Patil Marathi Book katha-kadambari (Novel) New Era Original price was: ₹250.00.Current price is: ₹200.00.
Back to products
Ranmeva (रानमेवा)-Sandip Khurud Marathi Book katha-kadambari (Novel) New Era
Ranmeva (रानमेवा)-Sandip Khurud Marathi Book katha-kadambari (Novel) New Era Original price was: ₹150.00.Current price is: ₹120.00.

Parikrama mandeshchi (परिक्रमा माणदेशची)-Dilip Mote Marathi Book katha-kadambari (Novel) New Era

Original price was: ₹180.00.Current price is: ₹144.00.

Author           :    Dilip Mote 

Edition          :     1 ed

Language    ‏  :     Marathi

ISBN               :     9789394266308

Publisher      :     New Era Publishing House

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Parikrama mandeshchi (परिक्रमा माणदेशची)-Dilip Mote Marathi Book katha-kadambari (Novel) New Era

मनोगत

हजारो वर्षापासून माणदेश हा पाण्यापासून वंचित असलेला भूभाग. इथल्या मातीची तृष्णा रामायण महाभारतापासून तशीच राहिली. इथल्या माणसांच्या सोबतीने वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या खिलार जनावरांनीही दुष्काळाची टोळधाड कायम अंगावर घेतली आहे.

खिलार कालवडीचा प्रवास ही एक सत्यकथा असून माणदेशातून आणलेली खिलार कालवड मराठवाड्याच्या वेगळ्या मातीत. वेगळ्या माणसात, वेगळ्या संस्कृतीत अन् वेगळ्या जनावरात रमली नाही. ती वेगवेगळ्या कारणांसाठी दावणी बदलत राहीली पण शेवटी तिची परिक्रमा माणदेशी मातीत येऊनच थांबली.

कथेच्या गरजेसाठी स्थळ, वेळ, काळ आणि नाव यांचा एकत्रित मेळ घातला आहे. यामध्ये कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसून, माणदेशचा संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न आहे.

कालवडीची गाई होते, माणदेशाला कृष्णेचं पाणी येतं. कळीकाळ जित्रासोबत माणसांचीही परिक्रमा घडवतो. त्या सर्वांसाठी ‘परिक्रमा माणदेशची.’

बऱ्याच दिवसापासून हे कथानक पुस्तक रुपाने मांडावं वाटत होतं. परंतु वेळ साधली जात नव्हती. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मध्ये लिहायला सुरवात केली. यावेळी अनेक संदर्भ माझ्या आई-वडील आणि संपूर्ण कुटुंबाने पुरवले त्यांचे ऋण व्यक्त करतो.

संदर्भासाठी गावकऱ्यांशी, मित्रमंडळीशी चर्चा व्हायच्या त्या सर्वांच्या सहकार्यासाठी आभार.

पुस्तक छपाईकरीता आमचे जिवलग स्नेही शरद तांदळे यांनी क्षणाचाही

विलंब न लावता होकार देत पर्वताएवढी उंची कायम राखली. जिवलग मित्र तुषार वाबळे आणि ब्रम्हा चट्टे यांनी उद्योजक असुनही हातातली कामे बाजूला सारत पुस्तक प्रकाशनासाठी अनमोल सहकार्य केले.

माणदेशाचे आजरामर लेखक ग.दि.मा. यांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी माडगूळकर परिवाराकडून आशिर्वाद दिले त्यांचे आभार. अत्यंत कमी वेळात माणदेशी लेखक सयाजीराव मोकाशी यांनी पुस्तकाची प्रस्तावना लिहली त्यांचे आभार. ऐतिहासिक संदर्भ पुरवणारे श्री. डी. आर. कुलकर्णी सरांचे आभार.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रकाशन सोहळा हा आपल्या घरातला कार्यक्रम असल्याचे सांगत एका क्षणात हा कार्यक्रम आळंदीला घेण्याचे नियोजन केले. त्याच्यासह गुरुवर्य कृष्णा रासकर आप्पा, विद्याताई तामखडे यांच्यासह राज्यातील पडळकरप्रेमी सहकार्यांचे आभार.

आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख व हर्षवर्धन देशमुख यांनीही वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल आभार.

पुस्तक लिखाणानंतर कव्हर पेजसाठी सलग चार दिवस वेगवेगळी चित्रं काढणारे आमचे मित्र प्रमोद देठे यांचेही आभार. माझ्या कोणत्याही कामासाठी धावणारे नानासाहेब झुरे आणि जयंत देठे यांनी चित्रकाराच्या दारात बसून पाठपुरावा केला त्यांचेही आभार.

शेवटच्या टप्प्यात स्केचेससाठी धावपळ करणाऱ्या गणेश कबीर, प्रतिभाताई सानप, अनंतराव पिसाळ, कृष्णा यादव, राजु रोरे, विवेक कांबळे यांच्यासह ओंकार रोकडे यांनी अत्यंत कमी वेळात स्केचेस बनवले त्यांचेही आभार.

शेवटी ऋणनिर्देश लिहताना मोठ्या मुलीचं नाव पुस्तकात आहे असं समजल्यावर पप्पा माझं पण हवं म्हणणाऱ्या महाश्वेता, लिखाणाला मदत करणाऱ्या मंजुषा व पत्नी सविता यांचेही मोलाची मदत झाली. पुण्याचा रत्नेश चोरगे याचेही आभार.

एकूणच माझं पुस्तक प्रकाशित व्हावं यासाठी गावकरी, मित्रपरिवार माझ्यावर प्रेम करणाऱ्या ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचा मी ऋणाईत आहे.

दिलीप मोटे

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.