Pakka Paya Scholarship Guide Class 4th – Bhag 1 Guide Va Sarav (Marathi Va Ganit) Prathamik Shishyavrutti Pariksha- Atul Bhoge Marathi Madhyam book

Original price was: ₹325.00.Current price is: ₹260.00.

Author        :    Atul Bhoge 

Edition        :    2026 ed

Language  ‏ :     MARATHI

Publisher   :     Pakka Paya Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Pakka Paya Scholarship Guide Class 4th – Bhag 1 Guide Va Sarav (Marathi Va Ganit) Prathamik Shishyavrutti Pariksha- Atul Bhoge Marathi Madhyam book

मनोगत…

नमस्कार! विद्यार्थी, शिक्षक व पालकवर्ग…..

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ४ थी पेपर १ मराठी व गणित, व पेपर २ इंग्रजी व बुद्धीमत्ता ही दोन संपूर्ण मार्गदर्शक व सराव पुस्तिका ‘पक्का पाया स्कॉलरशिप गाईड’ (क्लुप्त्या व सुत्रांसह) नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रकाशित करताना अतिशय आनंद होत आहे.

सध्याच्या या स्पर्धेच्या युगामध्ये सुयश संपादन करण्यासाठी ४थी स्कॉलरशिप मराठी माध्यमकरिता एका परिपूर्ण मार्गदरिकिची गरज लक्षात घेऊन घटक व उपघटकातील संकल्पना स्पष्ट करणारी व उत्तरापर्यंत जलद व अचुकतेने जाण्यासाठी “क्लृप्त्या व सूत्रे” यांचा भरपूर समावेश असणारी ‘स्कॉलरशिप गाईड’ या मार्गदर्शिकची निर्मिती केलेली आहे.

पेपर १ मराठी व गणित या मार्गदर्शिकिमध्ये मराठी या विषयांतर्गत येणारे सर्व घटक व उपघटक यांतील संकल्पना ‘लक्षपूर्वक वाचा व समजून घ्या’ या अंतर्गत स्पष्ट केलेल्या आहेत. परीक्षाभिमुख नमुना प्रश्न व प्रत्येक घटकासाठी आदर्श स्वाध्याय दिलेले आहेत. पुरेसे समानार्थी, विरुद्धार्थी, समूहदर्शक, अलंकारिक शब्द तसेच म्हणी व सामान्य ज्ञान दिलेले आहे.

गणित या विषयांतर्गत सर्वप्रथम संकल्पना स्पष्ट करण्यावर भर दिलेला आहे. योग्य काठिण्यपातळीचे नमुना प्रश्न व सरावासाठी स्वाध्याय दिलेले आहेत. सराव अचूक करण्यासाठी ‘सराव तक्ते’ दिलेले आहेत व सर्व घटकांच्या शेवटी सर्व घटकांची उत्तरसूची दिलेली आहे.

मार्गदर्शिकचे ठळक वैशिष्ट्ये म्हणजे सहज, सोपी व ओघवती भाषा, दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे,

क्लृप्त्या व सूत्रांचा समावेश, संकल्पना स्पष्ट करण्यावर अधिक भर तसेच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे परीक्षा परिषद पुणे यांनी ठरवून दिलेल्या काठिण्य पातळीच्या (३०% सोपे प्रश्न, ४०% मध्यम स्वरूपाचे व ३०% कठिण स्वरूपाचे प्रश्न) प्रश्नांचा समावेश केलेला आहे.

खऱ्या अर्थाने ‘पक्का पाया स्कॉलरशिप गाईड’ ही मार्गदर्शिका आपल्याला जिल्हा व राज्यस्तर शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी मदत करेल यात शंकाच नाही.

सदर मार्गदर्शिका अचूक व निर्दोष व्हावी यासाठी प्रयत्न केलेले आहेत. जरी नजरचुकीने काही चुका झाल्या असतील, तर जरूर कळवावे. आपल्या सूचनांचे स्वागतच केले जाईल.

विद्यार्थी, शिक्षक व पालकवर्ग हे या इ. ४ थी स्कॉलरशिप मार्गदर्शिका ‘पक्का पाया स्कॉलरशिप गाईड’चे स्वागत करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.

धन्यवाद !

श्री. अतुल भोगे (लेखक)

Available at Ksagar Book Centre or on www.

ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.