Nitishastra Sachoti Ani Abhiyogyata MPSC Va UPSC Prachi Ghosalkar Marathi Ethics Yes IAS
₹450.00 Original price was: ₹450.00.₹293.00Current price is: ₹293.00.
Author : Prachi Ghosalkar
Edition : 1 ed 2026
ISBN :
Language : Marathi
Publisher : Yes IAS Publications Pune
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Nitishastra Sachoti Ani Abhiyogyata MPSC Va UPSC Prachi Ghosalkar Marathi Ethics Yes IAS
लेखिकेचे मनोगत
प्रिय विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,
लोकसेवा आयोगाच्या (UPSC/MPSC) परीक्षेची तयारी करत असताना ‘नीतिशास्त्र’ (Ethics) हा विषय केवळ अभ्यासक्रमाचा एक भाग नाही, तर तो एका आदर्श प्रशासकीय अधिकाऱ्याचा कणा आहे. ‘नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता’ (Ethics, Integrity, and Aptitude) हा पेपर उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाची आणि निर्णयक्षमतेची खरी कसोटी पाहणारा असतो.
गेल्या काही वर्षांत शिकवत असताना मला प्रकर्षाने जाणवले की, विद्यार्थ्यांकडे या विषयाबद्दल कुतूहल आहे, पण योग्य मार्गदर्शनाची आणि, विशेषतः मराठीतून, दर्जेदार संदर्भ साहित्याची कमतरता आहे. पाश्चात्य विचारवंत असो किंवा भारतीय तत्त्वज्ञान, यातील संकल्पना जोपर्यंत सोप्या भाषेत उमजत नाहीत, तोपर्यंत घटना अभ्यास (Case Studies) सोडवताना आत्मविश्वास निर्माण होत नाही. याच गरजेतून आणि “विद्यार्थ्यांना सर्वोत्तम तेच द्यावे” या ध्यासातून हे पुस्तक साकार झाले आहे.
या पुस्तकाची रचना करताना आयोगाच्या बदलत्या स्वरूपाचा सखोल विचार केला गेला आहे. संकल्पनांची स्पष्टता (Conceptual Clarity) आणि मुख्य परीक्षेत उत्तर लिहिताना लागणारी नेमकी भाषा आणि पद्धत, यावर विशेष भर देण्यात आला आहे. इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांतील महत्त्वाच्या संज्ञांचा (Keywords) वापर केला आहे, जेणेकरून भाषेचा अडसर तुमच्या यशात येणार नाही.
‘Yes IAS’ च्या माध्यमातून, “Inspiring Excellence” हे ध्येय उराशी बाळगून आम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. हे पुस्तक तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देईल आणि भविष्यात एक संवेदनशील व कार्यक्षम अधिकारी म्हणून तुम्हाला घडवेल, असा मला ठाम विश्वास आहे.
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि परीक्षेतील यशासाठी खूप खूप शुभेच्छा !
आपली नम्र,
प्राची घोसाळकर
(संचालिका, Yes IAS)
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
| Language | Marathi |
|---|---|
| Publication House | Yes IAS Publications Pune |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.