Samajshastra Vishay Ani Drushtikon
Samajshastra Vishay Ani Drushtikon Original price was: ₹400.00.Current price is: ₹360.00.
Back to products

NET/SET/JRF/PET Paper –1 Sampoorna Margadarshak 2018-2025 Chya Set Prashnapatrikasah Dr. Shashikant Annadate & Swati Shete नेट-सेट पेपर – १ संपूर्ण मार्गदर्शक

Original price was: ₹725.00.Current price is: ₹508.00.

Author         :   Dr. Shashikant Annadate & Swati Shete

Edition         :  12-TH   2026-27

ISBN             :   9789384730871

Language  ‏  :     Marathi

Publisher   ‎ :     KSagar publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

NET/SET/JRF/PET Paper –1 Sampoorna Margadarshak 2018-2025 Chya Set Prashnapatrikasah Dr. Shashikant Annadate & Swati Shete नेट-सेट पेपर – १ संपूर्ण मार्गदर्शक

लेखकाचे मनोगत

राष्ट्रीय स्तरावर नेट परीक्षा विद्यापीठ अनुदान आयोगाकडून, तर राज्यपातळीवर महाराष्ट्रात सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून आयोजित केली जाते. नेट-सेंट या परीक्षांच्या अनिवार्य पहिल्या पेपरच्या नवीन अभ्यासक्रमास अनुसरून दर्जेदार संदर्भग्रंथाची अकरावी आवृत्ती आज के सागर पब्लिकेशन्सकडून प्रकाशित होत आहे.

आमच्या शिक्षण क्षेत्रातील वाटचालीत ज्यांचे नेहमीच मार्गदर्शन व पाठिंबा राहिला, ज्यांनी नोकरीच्या प्रारंभापासून संधीचे सोने करा हा मूलमंत्र दिल्यामुळे आम्हाला सातत्याने कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळते असे आमचे मार्गदर्शक श्री. आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन व कोल्हापुरातील नामवंत ज्येष्ठ विधिज्ञ मा. अॅड. के. ए. कापसे साहेब यांचे आम्ही अतिशय ऋणी आहोत, संस्थेचे व्हाईस चेअरमन मा. अॅड. अभिजित कापसे साहेब यांनी सातत्याने चांगले लेखन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. संस्थेचे सचिव मा. मोहन गरगटे साहेब यांनी नवीन ग्रंथलेखनाबाबत आमच्याकडे आस्थेने वेळोवेळी चर्चा केली, संस्थेचे खजिनदार मा. गुणवंत रोटे साहेब, महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी, समन्वयक डॉ. महादेव शिंदे, शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रद्धा पाटील यांनी आम्हाला पुस्तक लेखनासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत.

आमच्या संस्थेचे ज्येष्ठ सदस्य व कोल्हापुरातील नामवंत वकील मा. अॅड. विद्याधर पाटील साहेब यांनी आमच्याकडे सदैव नवीन लेखन कार्याबद्दल चौकशी केली, काहीही मदत लागली तर निःसंकोच मदत मागावी, असे आवर्जून सांगितले व नेहमीच आम्हाला चांगल्या कार्यासाठी पाठिंबा दर्शविला त्याबद्दल आम्ही त्यांचे अतिशय ऋणी आहोत. आमच्या संस्थेच्या देशभूषण शाळेतील विद्यार्थित्रिय शिक्षिका मा. श्रीमती सुहासिनी पाटील मॅडम यांनीही आम्हाला वेळोवेळी मदत केली, मार्गदर्शन केले, आस्थेने चौकशी केली त्याबद्दल आम्ही त्यांचे अतिशय ऋणी आहोत.

शिक्षण क्षेत्रातील वाटचालीत आम्हाला सातत्याने प्रेरणा देणारे व सदैव मार्गदर्शन करणारे सर्व गुरुवर्य माजी उच्च शिक्षण संचालक प्राचार्य डॉ. प्रकाश गायकवाड, शिक्षणतज्ज्ञ डॉ. ह. ना. जगताप, शिवाजी विद्यापीठ शिक्षणशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन प्राचार्य डॉ. बी. पी. मरजे, शिवाजी विद्यापीठ शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे, शिवाजी विद्यापीठ दुरस्थ शिक्षण केंद्राचे प्रमुख डॉ. कृष्णा पाटील, आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्य डॉ. वंदना नलावडे, पीएच. डी. मार्गदर्शिका डॉ. पद्मा जाधव, डॉ. प्रतिभा पाटणकर, डॉ. रामचंद्र व्हनबट्टे, डॉ. नंदकुमार धनवडे, डॉ. ए. बी. पाटील, डॉ. केशव मोरे यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही त्यांचे अतिशय ऋणी आहोत.

पुस्तक लेखनाचे कार्य करताना ज्यांचे आशीर्वाद व प्रेरणा सदैव आमच्या पाठीशी असते असे आमचे आई-वडील, दोन्ही बहिणी सौ. सुनंदा जिनदास संगवे व सौ. निर्मला कुलभूषण उखळकर यांनीही वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही अतिशय ऋणी आहोत.

सर्वोत्तम लेखनासाठी पदोपदी आम्हाला मार्गदर्शन करणारे पॉलिटी ऑफ इंडिया यासारख्या अनेक सुप्रसिद्ध ग्रंथांचे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील नामवंत विद्यार्थित्रिय लेखक व संपादक मा. के’ सागर (मा. व्ही. एस. क्षीरसागर) यांनी आम्हाला ग्रंथलेखनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले, प्रेरणा दिली. त्यांचा व त्यांचे सर्व सहकारी सौ. अर्चना पडवळ मॅडम, सौ. तेजस्विनी महातुंगडे, सीमा ढमढेरे, भक्ती गोसावी, वैशाली मॅडम, अश्विनी मॅडम, भारती मॅडम, मुखपृष्ठकार विजय कोळसकर, राहुल सर व सचिन सर यांचा मी अतिशय आभारी आहे.

प्रस्तुतच्या दर्जेदार संदर्भग्रंथाच्या माध्यमातून विद्यार्थिमित्रांना नेट-सेट परीक्षांत यशस्वी होऊन पुढील यशदायी वाटचाल करण्यास प्रेरणा मिळेल, यात शंकाच नाही. शुभेच्छांसह !!

आपलेच विश्वासू लेखक,

डॉ. शशिकांत अन्नदाते, स्वाती शेटे

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Publication House
Language
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.