Namdar Gokhalyamcha Bharat Sevak Samaj ( नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज )-Narendra Chapalgaonkar (Marathi) (Novel) BOOK KATHA-KADAMBARI

Original price was: ₹225.00.Current price is: ₹192.00.

Author         :      Narendra Chapalgaonkar

Edition         :      1 ed

Language ‏   :      Marathi

Publisher  ‎  :      Mouj Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Namdar Gokhalyamcha Bharat Sevak Samaj ( नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज )-Narendra Chapalgaonkar (Marathi) (Novel) BOOK KATHA-KADAMBARI

१२ जून १९०५ रोजी पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज जवळच्या टेकडीवर तीन तरुण गेले आणि त्यांनी पूर्णवेळ देशसेवा करण्याची शपथ घेतली. आपल्या या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी त्या तिघांपैकी एकाने-गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज’ या स्वयंसेवी संघटनेची स्थापना करण्याचे ठरवले होते. इतर दोघे या उपक्रमात गोखल्यांचे पहिले सहकारी झाले होते. एक उदारमतवादी स्वच्छ चारित्र्याचे देशभक्त म्हणून ना० गोपाळ कृष्ण गोखले भारताच्या राजकीय इतिहासाला माहीत आहेत.

गोखल्यांनी स्थापन केलेल्या ‘भारत सेवक समाजा’चे काम आजही चालू आहे. आपल्या दीर्घकाळच्या देशसेवेत या संस्थेने निरलस आणि त्यागी सभासदांची एक परंपराच निर्माण केली. गोपाळ कृष्ण देवधर, नारायण मल्हार जोशी, श्रीनिवास शास्त्री, ठक्करबाप्पा, हृदयनाथ कुंझरू अशा अनेकांचा त्यात समावेश आहे. या संस्थचे सभासद होऊन आपण देशसेवेचे काम करावे, असे ज्यांना वाटले त्यात महात्मा गांधी, डॉ० राजेंद्रप्रसाद यांचाही समावेश होता. आज कागदोपत्री या संस्थेचे नाव ‘हिंद सेवक समाज’ असे काही तांत्रिक कारणासाठी झाले असले तरी जुन्याच नावाने तिला अजूनही देशभर ओळखले जाते. दोन वर्षांपूर्वी संस्थेचे संस्थापक गोपाळ कृष्ण गोखले यांची जन्मशताब्दी साजरी झाली. त्यानिमित्ताने या संस्थेच्या कार्याची ओळख करून देणारे एखादे पुस्तक प्रसिद्ध व्हावे, अशी इच्छा व्यक्त झाली.

अर्वाचीन सामाजिक व राजकीय इतिहासाचे एक अभ्यासक व मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्या० नरेन्द्र चपळगावकर यांनी आमच्या विनंतीला मान देऊन संस्थेचा, तिच्या प्रमुख सभासदांचा आणि त्या काळाचा परिचय करून देणारे एक पुस्तक लिहिण्याचे मान्य केले. ते आता प्रसिद्ध होत आहे. हे पुस्तक जशी भारत सेवक समाजाची ओळख करून देते तशीच ती गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचाही परिचय करून देते. या ग्रंथलेखनाबद्दल मी न्या० चपळगावकर यांचा मनःपूर्वक आभारी आहे.

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.