

Na Khant Na Khed ( ना खंत ना खेद )-Bhimrao Patole Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen
₹250.00 Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
Author : Bhimrao Patole
Edition : 1 ed
Language : Marathi
ISBN : 30406
Publisher : Samakaleen Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Na Khant Na Khed ( ना खंत ना खेद )-Bhimrao Patole Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen
मनोगत
▶ मी भीमराव पाटोळे. वयाच्या विशीत असल्यापासून गेली साठ वर्षं मी कुठल्या ना कुठल्या सामाजिक किंवा राजकीय कामांत गुंतलेलो आहे.
माझा जन्म गरीब मातंग आई-वडिलांच्या पोटी झाला. त्यामुळे माझा वावर गरिबांमध्ये असणं स्वाभाविकच होतं. सोलापूर जिल्ह्यातल्या बावी नावाच्या एका छोट्याशा खेड्यातून मी पुण्यात आलो आणि माझ्या जगण्याला आकार मिळत गेला. मी ज्या वस्तीत राहत होतो, तिथूनच माझ्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली. राष्ट्र सेवा दल, समाजवादी चळवळ यांमुळे मला जगण्याला हेतू मिळाला. झोपडी संघ, मातंग सभा, दलित स्वयंसेवक संघ, रिक्षावाले आणि पथारीवाल्यांची संघटना अशा अनेक आघाड्यांवर मी काम करत गेलो. समाजवादी पक्षात स्थानिक स्तरापासून राज्यस्तरापर्यंत सहभाग दिला. मोर्चे काढले, निदर्शनं केली, जेलमध्ये गेलो. आणीबाणीच्या काळात दहा महिने येरवड्याच्या जेलमध्ये काढली. पक्ष आणि पक्षाचा विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी झटत राहिलो. राज्यभर आणि देशात कुठेकुठे भ्रमंती करत राहिलो.
या काळात मोठमोठ्या माणसांबरोबर काम करायची संधी मिळाली. भाई वैद्यांमुळे माझं आयुष्य बदलून गेलं. त्यांच्याचमुळे एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे या पुण्यातल्या दिग्गज लोकांच्या संपर्कात आलो. पुढे जॉर्ज फर्नांडिस, मृणालताई गोरे, मधू दंडवते, मधू लिमये यांच्यापासून चंद्रशेखर, जयप्रकाश नारायण इथपर्यंतच्या थोरामोठ्यांबरोबर काम करू शकलो. शिवाय पन्नालाल सुराणा, मोहन धारिया, कुमार सप्तर्षी, नामदेव ढसाळ, बाबा आढाव अशा विविध विचारांच्या लोकांच्या संपर्कात आलो. पुढे समाजवादी चळवळ अस्तंगत होऊ लागल्यावर काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याशिवाय मला पर्याय राहिला नाही. समाजवादी पक्षात असताना आणि नंतर काँग्रेसमध्ये आल्यावर मी निवडणुकाही लढवल्या. महानगरपालिकेपासून विधानसभेपर्यंत.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.