Muktimargachya Pravasini मुक्तिमार्गाच्या प्रवासिनी Tara Bhavalkar

Original price was: ₹180.00.Current price is: ₹135.00.

Author          :     Tara Bhavalkar

Edition         :      2019

Language ‏    :     Marathi

Publisher  ‎   :     The Unique Foundation

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Muktimargachya Pravasini मुक्तिमार्गाच्या प्रवासिनी Tara Bhavalkar

संत कवयित्रींची मुक्तिसंकल्पना

तारा भवाळकर

संताचे साहित्य संकुचित अथनि केवळ धार्मिक म्हणून पाहिले जाते, पण ते अधिक व्यापक अर्थी जीवनविषयक चिंतन आहे. ते केवळ प्रस्थापित संस्कृति आणि व्यवस्था यांचे समर्थन करत नाही, तर त्याचा निषेध करते, त्या विरोधी आत्मिक बळही देते आणि विद्रोहाची भूमिका घेते हेही आता मान्य होत चालले आहे.

या पार्श्वभूमीवर स्त्री संतांच्या रचनांचे विश्लेषण करणे हे प्रा. डॉ. तारा भवाळकरांनी या पुस्तकाद्वारे केले आहे. एकीकडे अगदी कश्मिरपासून ते दक्षिणेकडील केरळ-तमीळनाडू पर्यंत आणि पूर्वेकडील बंगालपासून पश्चिमेच्या गुजराथ-राजस्थान पर्यंतच्या सर्व स्त्री-संतांच्या वचनांचा पट त्यांनी यामध्ये खुला केला आहे. हा आढावा घेताना मध्ययुगीन स्त्री जीवनाचा धांडोळा, तसेच स्त्री संतांनी केलेली वैचारिक बंडखोरी त्यांनी समोर ठेवली आहे. स्त्रीवादी दृष्टिकोनातून केलेल्या या विश्लेषणातून प्रा. डॉ. तारा भवाळकरांचे हे पुस्तक एक नवे दर्शन घडवते.

स्त्री दृष्टिकोनातून त्यांनी केलेली परखड मांडणी, संतांच्या मनातील द्वंद्व आणि राजकीय परिस्थितीशी घातलेली सांगड आपल्याला आजच्या समाजातील द्वंद्वाला आणून भिडवते व विचार करण्यास भाग पाडते. आणि म्हणून समकालीन वैचारिक संघर्षाला या पुस्तक रूपाने एक पार्श्वभूमी मिळवून देणारे त्यांचे हे योगदान महत्त्वाचे ठरते.

यासाठी अकादमिक क्षेत्रात सर्वांनी वाचावे असे हे पुस्तक…

Muktimargachya Pravasini Unique, Tara Bhavalkar Book.

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.