Mrudgandh Vinda Karandikar मृदगंध विंदा करंदीकर

Original price was: ₹225.00.Current price is: ₹200.00.

Author         : Vinda Karandikar

Edition         : 2022

ISBN             : 978-81-7991-890-6

Language  ‏  : Marathi

Publisher  ‎ : Popular Prakashan पॉप्युलर प्रकाशन

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Mrudgandh Vinda Karandikar मृदगंध विंदा करंदीकर

विंदा करंदीकर

विंदा करंदीकरांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजूक भावसौंदर्य ह्यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या एखाद्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते – अशा वेळी तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य, तिची अवखळ झेप पाहता- ऐकता क्षणीच आपले मन वेधून घेते तर कधी कधी ‘लपतछपत हिरवळीतून’ वाहणाऱ्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते. प्रमत्त पुंगवाची मुसंडी आणि हरिणशावकाची नाजूक हालचाल, दगडगोट्यांनी भरलेले विस्तीर्ण माळरान आणि तुरळक नाजूक रानफुलांनी नटलेली लुसलुशीत हिरवळ, गौतमबुद्धाची ध्यानमग्न मूर्ती आणि जातिवंत विदूषकाची मिस्कील नजर ह्यांची एकदम किंवा एकामागून एक आठवण व्हावी असेच तिचे रूप आहे. निखालस शारीर अनुभवांतील रसरशीत सत्याला सुरूप देण्यात जशी ती रंगून जाताना दिसते तशीच केवळ वैचारिक अनुभवांच्या वातचक्रातून गिरगिरत वर वर जाण्यात संपूर्ण देहभान विसरते. ती कधी चित्रमयी बनते, कधी कोड्याच्या भाषेत बोलते, तर कधी तिच्या अभिव्यक्तीत एक प्रकारचा गद्याचा परखडपणा अवतरतो. तिचे रूप न्यारे आहे, व्यक्तित्व आगळे आहे. तिचा रोख झोक नोक सर्व तिचा आहे. ती एकाच वेळी रसिकास आकर्षून घेते आणि गोंधळून सोडते. ‘स्वेदगंगे’ नंतर अवतरणाऱ्या ह्या ‘मृद्गंधा’त तिची ही सर्व वैशिष्ट्ये प्रकट झाली आहेत.

UPSC Preparation Books from  Marathi Literature ,Main Exam .( Optional ) Available at Ksagar Book Centre or on ksagaronline.com or call on 9545567862

Additional information
Publication House

Language

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.