MPSC Ganit va Buddhimatta 2026 Te 2011 Bilingual 2700+ Topicwise PYQ Question book -Pavan Patil-basic2building
₹500.00 Original price was: ₹500.00.₹325.00Current price is: ₹325.00.
Author : Pavan Patil
Edition : 2 ed -2026
Language : Marathi-English
Publisher : basic2building
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
MPSC Ganit va Buddhimatta 2026 Te 2011 Bilingual 2700+ Topicwise PYQ Question book -Pavan Patil-basic2building
मनोगत….
MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना “MPSC-गणित व बुद्धिमत्ता दिशादर्शक” हे महाराष्ट्रातील पहिलेच द्विभाषिक पुस्तक देताना खूप आनंद होत आहे. लेखक म्हणून पुस्तक लिहिण्यात आणि शिक्षक म्हणून पुस्तक लिहिण्यात नक्कीच फरक असतो. MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा मधील बुद्धिमत्ता व गणित या विषयाची तयारी करताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या संघर्षात छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून करत आहे. राज्यसेवा, संयुक्त गट ब व गट क च्या पूर्व व मुख्य परीक्षांमध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचणी हा अतिशय महत्त्वाचा विषय ठरलेला आहेच तसेच MPSC कडे वर्ग झालेल्या सर्व सरळ सेवा परिक्षामध्ये हा विषय महत्वाची भूमिका बाजावेल.
त्यामुळे कमीत-कमी वेळेमध्ये या विषयाची ओळख व्हावी व अभ्यासक्रमाचा आवाका लक्षात यावा यासाठी आयोगाने 2011 ते 2026 पर्यंत घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील गणित व बुद्धिमत्ता चाचणीचे सर्व प्रश्न्न घटकनिहाय तसेच पूर्व व मुख्य असे वर्गीकृत करून दिले आहेत. प्रश्न मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत देण्याचा प्रयत्न केला आहे.
पुस्तक काढणे ही एका दिवसाची प्रक्रिया नाही यामध्ये मला अनेकांची साथ मिळाली ज्यांचा उल्लेख केल्या व्यतिरिक्त मी पुढे जाऊच शकत नाही. सगळ्यात पहिल्यांदा YouTube वरती तुम्ही विद्यार्थ्यांनी दिलेला भरघोस प्रतिसाद उल्लेख करण्यासारखे म्हणजे TAIT परीक्षेवेळी 5000 पेक्षा अधिक विद्यार्थी LIVE असायचे. यातून मिळालेल्या आत्मविश्वासतूनच पुस्तकाचा एक नवीन प्रयत्न करत आहे.
माझे वडील बंधू प्रा. कवी मकरंद पाटील, अप्पा हतनूरे सर, साई डहाळे सर, स्वी बारस्कर, किरण निंभोरे, सतीश बोरकडे, रोहित जाधव सर, राजू मुसांडे सर, अमित जाधव, जितेंद्र पाटील यांचे सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन भेटले. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीत सिंहासारखे पाठीशी उभे असणारे आमचे मित्र अमित कुथ्थे, अतुल गंगावणे, उद्धव डांगे, जयदीप पाटील, संतोष हतनूरे यांची साथ भेटली. तसेच basic2building चे आधारस्तंभ धिरज तुकाराम शिंदे सर, सुनील गडदे सर व जीवन गडदै सर यांचे मनापासून आभार मानतो.
या सर्वात अति महत्त्वाची साथ देणारी माझी पत्नी आरती पाटील जिच्याशिवाय माझे कोणतेच काम पूर्ण होऊच शकत नाही हिचे सुद्धा मनापासून आभार मानतो.
सर्व प्रयत्न करूनही पुस्तकात काही चुका राहिल्यास तुमच्या सूचनांचे स्वागतच असेल. तुमच्या बुद्धीरुपी तलवारीला धार देण्याचं काम हे शब्दरूपी पुस्तक करेल आणि तुमच्या परीक्षेसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल तुमच्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा…
पवन राजेश्वरराव पाटील
basic2building
Academy & Publication
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
| Language | English, Marathi |
|---|---|
| Publication House | basic2building Prakashan |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.