MPSC Combined Purva Gat B Va Gat K 2011 Te 2025-bhagwat mulgir,Parvej Nadaf Prashnapatrika Vishlesha
प्रस्तावना…
सर्वप्रथम तुमचे अभिनंदन!
विश्लेषण पुस्तकात खूप चांगल्या पद्धतीने प्रश्नांचे विश्लेषण केले आहे. माझ्या मते, आपण प्री आयएएस ट्रेनिंग सेंटर, कोल्हापूर येथे अभ्यास करताना केलेल्या चर्चा, संवाद, वाद-विवाद, इ. गोष्टींचा संदर्भ बऱ्याच ठिकाणी आल्याचं मला जाणवलं.
खरं तर विश्लेषणासारख्या पुस्तकातून आपल्याला फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत आणि त्या प्रश्नाचे उत्तर सोडवताना आपणास कोणते मुद्दे आठवायला पाहिजे होते, ज्यामुळे आपलं उत्तर बरोबर आलं असतं, हेच घेण्यासारखं असतं. विश्लेषण पुस्तकात आपण भरमसाठ माहिती दिली तर परीक्षार्थी मूळ विषयांच्या संदर्भग्रंथावर उजळणी न करता त्या विश्लेषण पुस्तकावर अवलंबून राहतात आणि ही गोष्ट खरंतर नुकसानकारक ठरू शकते, असे मला वाटतं. त्यामुळे विश्लेषणाबरोबर संदर्भग्रंथ वाचणे आवश्यक आहे. या पुस्तकात भरमसाठ माहिती न देता नेमकी आणि प्रश्नाला अनुसरून विश्लेषण दिले आहे. तसेच प्रश्न बरोबर का आहे किंवा तो चुकीचा का ठरतो किंवा तो प्रश्न रद्द का करण्यात आला आहे याचेदेखील विश्लेषण विधानानुसार व पर्यायानुसार दिले आहे, ही गोष्ट खूपच मार्गदर्शक आहे. त्यामुळे परीक्षार्थीना हे पुस्तक नक्कीच फायदेशीर ठरणार यात शंका नाही.
पुन्हा एकदा तुम्हाला विश्लेषण पुस्तकासाठी खूप खूप शुभेच्छा…
अरुण बाळासो पाटील पोलीस उपअधीक्षक
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.