Menduchi Mashagat (मेंदूची मशागत)-Deva Zinjad Marathi Book katha-kadambari (Novel)
‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ हा दर्जेदार कवितासंग्रह आणि ‘एक भाकर तीन चुली’ सारख्या लोकप्रिय कादंबरीनंतर देवा झिंजाड यांचं ‘मेंदूची मशागत’ हे तिसरं पुस्तक. या पुस्तकात वेगवेगळ्या विषयांवरचे विविध भाव वाचायला मिळतात. या पुस्तकाची नाळ गावाच्या मातीशी जोडलेली आहे, कारण देवा झिंजाड हे गावगाड्याचे लेखनाच्या माध्यमातून अवलोकन करणारे आहेत. ते शहरात राहत असले तरी त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा कठीण काळ गावात गेलेला आहे. त्या संघर्षाच्या अनुभवांना त्यांनी छोट्या छोट्या लेखांच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडले आहे. त्यातून अनेक ज्वलंत विषयांना त्यांनी तोंड फोडले आहे.
डिजिटल युगातही पत्राच्या माध्यमातून आपली आईवडिलांशी जोडलेली नाळ महत्त्वाची ठरते. हे पहिल्याच ‘काळजाला हात घालणारी पत्र’ या प्रकरणातून दाखवून दिलं आहे. नष्ट होत चाललेल्या पत्रव्यवहार संस्कृतीमुळे आपण भविष्यात काय गमावणार आहोत, याचीही जाणीव लेखक करून देतो. काही प्रकरणातून त्यांनी स्त्रियांचे अत्यंत सक्षम आणि प्रगल्भ रूप वाचकांसमोर मांडले आहे. शेतीमधील स्त्रियांचे स्थान अधोरेखित केले आहे. बऱ्याच वेळा आपण भ्रामक गोष्टींच्या मागे असतो, सतत कशाच्या ना कशाच्या मागे धावतो पण आपले हात रिकामेच राहतात, तेव्हा ‘तुझे आहे तुजपाशी’ ही उक्ती लक्षात घेण्यासारखी आहे. आपल्याजवळ सगळं काही असतं पण ते समजणं आणि शोधणं यामध्ये फरक असतो. आपण आपल्या इच्छाशक्तीच्या आणि कष्टाच्या जोरावर आपल्या सद्यःस्थितीमध्ये नक्कीच परिवर्तन घडवून आणू शकतो, असं हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहतं.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.