Marathyancha Darara VA. Go.Apte,Yashodhan Joshi Marathi Book katha-kadambari (Novel)-Krishna मराठ्यांचा दरारा
₹400.00 Original price was: ₹400.00.₹320.00Current price is: ₹320.00.
Author : VA. Go.Apte,Yashodhan Joshi
Edition : 1 ed 2025
Language : Marathi
ISBN : 9788199128057
Publisher : Krishna Publications
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Marathyancha Darara VA. Go.Apte,Yashodhan Joshi Marathi Book katha-kadambari (Novel)-Krishna मराठ्यांचा दरारा
प्रस्तावना
इ ‘सवी सनाचे सतरावे आणि अठरावे शतक हे भारताच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे मानले गेले पाहिजे. कारण, सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात शहाजीराजांनी स्वराज्याच्या स्थापनेचा पहिला अयशस्वी प्रयत्न केला; परंतु सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले आणि अठराव्या शतकात या राज्याच्या सीमा अटक ते कटक आणि पेशावर ते तंजावर अशा विस्तारल्या. ज्याच्याशी मराठ्यांच्या तीन पिढ्यांनी संघर्ष केला अशा औरंगजेबानंतर मराठ्यांना शत्रू असा उरला नाही आणि एक वेळ तर अशी आली की, मुघलांना ‘आम्हाला आश्रय द्या, आमचे संरक्षण करा,’ अशी विनंती मराठ्यांना करावी लागू लागली आणि शेवटी इंग्रज भारताचे राज्यकर्ते झाले तेही मराठ्यांना पराभूत करूनच.
या मराठ्यांच्या राज्यातील अठराव्या शतकातील पराक्रमी मंडळी असे म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर येतात ते पेशवा, त्यांनी उभी केलेली होळकर, शिंदे, पवार, गायकवाड, पटवर्धन वगैरे मंडळी. आणि मोहिमा किंवा लढाया म्हटल्या तर चटकन याच मंडळींनी उत्तर आणि दक्षिणेकडे गाजवलेल्या मोहिमा सांगता येतात. याच कालखंडात अन्यही महत्त्वाची व कर्तबगार मंडळी होऊन गेली ज्यांनी भारताच्या पूर्वेकडील प्रचंड मोठ्या अशा बंगालच्या सुभ्यावर म्हणजे आजचा बंगाल, बिहार आणि ओरिसा अशा भूभागावर मोठा पराक्रम गाजवून मराठ्यांच्या साम्राज्यविस्ताराला हातभार लावला. त्या मंडळींची व त्यांच्या कार्याची मात्र दुर्दैवाने फारशी चर्चा होताना दिसत नाही.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.