Marathi Vyakaran (मराठी व्याकरण)-Nilesh Deshmukh MPSC Book
प्रस्तावना
लोकसेवेची संधी, अधिकार तसेच प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेची हमी मामुळे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा व संयुक्त परीक्षेकडे महाराष्ट्रातील तरुण-तणीचा मोठ्या प्रमाणात काल आहे. या परीक्षांसाठी मराठी भाषा हा विषय अनिवार्य आहे. या विषयात भाषेचे व्याकरण, आकलन, निबंध लेखन आणि एक तृतीयांश सारांश या घटकांचा समावेश आहे. या घटकांवर आधारित परिपूर्ण स्वल्याच्या तोही मागील काही वर्षातील विचारलेल्या प्रश्नांचे स्वरूप संभाव्यता, शक्यता लक्षात घेऊन लिहिलेल्या, आकलन व अभ्याससुलम अशा संदर्भग्रंथाची आवश्यकता परीक्षार्थी-विद्यार्थी, तसेच कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकानाही भासत होती. ही उणीव सुबोध मांडणीद्वारे लिहिलेल्या ‘मराठी व्याकरण या निलेश देशपांडे यांच्या प्रस्तुत संदर्भ प्रजा मार्गदर्शक पुस्तकाने मोठ्या प्रमाणात भरून निघाली आहे, असे हे पुस्तक बारकाईने अभ्यासल्यावर याही प्रामाणिक मत झाले आहे. किंबहुना असंही म्हणता येईल, की हा एक ग्रंथ स्पर्धा परीक्षेसाठी मराठी भाषेत उत्तम गुण मिळविण्यासाठी पुरेसा आहे. अत्यंत परिश्रमपूर्वक लिहिलेल्या या संदर्भ ग्रंथासाठी मी निलेश देशपांडे याचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
मी १९८२ च्या MPSC परीक्षेमध्ये टॉपर होतो. मराठी विषयात उत्तम गुण मिळविण्यासाठी इतर विषयांप्रमाणे मराठीचाही पद्धतशीर अभ्यास करणे किती महत्त्वाचे व आवश्यक आहे. याची मला पूर्ण जाणीव आहे. त्या काळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा माझ्या मराठवाड्यात मागमूसही नव्हता, त्यामुळे मला माझ्या मराठीच्या शालेय शिक्षकांकडे महिनाभर शिकवणी लावावी लागली होती. मी मराठी साहित्य विपुल वाचत असल्यामुळे निबंध लेखन, उतारा वाचन आणि आकलनासाठी मला फारसे प्रयास कराये लागले नव्हते. मात्र मला मराठी व्याकरणासाठी परिश्रम करावे लागले होते, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. त्याचे कारणही सांगतो.
MPSC परीक्षेला बसणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी असते, त्यामुळे हा विषय सोपा आहे असे सुरुवातीला वाटत असते. MPSC च्या अभ्यासक्रमात विषय व घटकांची माहिती थोडक्यात दिली आहे, वी म्हणजे दहावी/बारावी अभ्यासक्रमाच्या समकक्ष अशी विषयाची व्याप्ती आहे. पण जेव्हा विद्यार्थी मागील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहतो, तेव्हा बहुसंख्य विद्यार्थ्यांना व्याकरणात विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाच्या स्वरूपाने काहीशी धास्ती वाटू शकते.
निलेश देशपांडे यांच्या प्रस्तुत ‘मराठी व्याकरण’ या पुस्तकाचे वैशिष्ट्य व ‘Unique Selling Point’ म्हणजे मराठी भाषेची उत्पत्ती ते आकलन ही अभ्यासक्रमाची व्याप्ती त्यांनी जवळपास पूर्णपणे चर्णिली आहे. त्याचबरोबर सदर पुस्तकासोबत शब्दसंग्रहाचा समावेश केला आहे. पुस्तकाची रचना स्व-मार्गदर्शक म्हणजेच Self Help Guide सारखी आहे. मराठी व्याकरण हे अत्यंत शास्त्रीय व परिपूर्ण आहे. त्यातील वर्ण विचार, संधी, विभक्ती, धातू, काळ, समास, वाक्यविचार, विरामचिन्हे, वृत्ते, अलंकार आदी एकूण २१ प्रकरणांमध्ये पुस्तकाची रचना केली आहे. प्रत्येक प्रकरणात विपुल उदाहरणे देत तो घटक वाचताना सुलभतेने आकलन होईल असा सुबोध व परिपूर्ण ग्रंथ तयार केला आहे. प्रत्येक प्रकरणानंतर मागील वर्षांत त्या घटकावर कोणते प्रश्न विचारले होते हे दिल्यामुळे पणत्या भागावर विशेष भर द्यावा, हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येऊ शकते. मिलेश देशपांडे हे अनेक वर्षापासून स्पर्धा परीसाठी मराठी भाषा व्याकरण हे विषय शिकवतात, त्यामुळे त्यांग विद्याच्यौण मराठीचा अभास करताना कोमल्या समस्या जाणवतात, याचे ज्ञान आहे
Useful For MPSC Mains, PSI, STI, ASO and Other Exams
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.