Marathi Sahitya Paper 1 UPSC-MPSC Vaikalpik Vishay (Optional) Pracharya Dr.Chandrashekhar Bhagat K Sagar Marathi Vangmay
₹395.00 Original price was: ₹395.00.₹277.00Current price is: ₹277.00.
Author : Pracharya Dr.Chandrashekhar Bhagat
Edition : 2026
Language : Marathi
Publisher : K Sagar Publications
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Marathi Sahitya Paper 1 UPSC-MPSC Vaikalpik Vishay (Optional) Pracharya Dr.Chandrashekhar Bhagat K Sagar Marathi Vangmay
के’ सागरीय….
या वर्षीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात मूलभूत सुधारणा झाल्या असून हा अभ्यासक्रम आता बव्हंशी केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेप्रमाणेच राहणार आहे. यापूर्वी राज्य लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपातच होत होती; ती आता परंपरागत वर्णनात्मक पद्धतीची असणार आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा बदल खूपच मोठा म्हणजे अगदी Drastic म्हणावा असा वाटतो. खरे तर, या नव्या अभ्यासक्रमानुसार बहुतेक विषयांवर के ‘सागर प्रकाशनाने संदर्भ ग्रंथ प्रकाशित केले असून उर्वरित विषयांवर संदर्भ प्रकाशित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्रस्तुतचा संदर्भ मराठी साहित्य पेपर १ विषय सांकेतांक १०३७ या वैकल्पिक विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे.
या संदर्भाची रचना साकारताना तो राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी तर उपयुक्त ठरावाच पण पदवी वा पदव्युत्तर परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही उपयुक्त व्हावा, असा समन्वयित दृष्टिकोन अंगीकारला आहे.
प्राचार्य डॉ. चंद्रशेखर भगत यांच्या-सारख्या या विषयातील अभ्यासू सुहृदाच्या लेखणीतून प्रस्तुतचा संदर्भ साकारला आहे. डॉ. भगत यांनी हे पुस्तक लिहिताना घेतलेले परिश्रम पानापानांतून आणि शब्दाशब्दांतून जाणवल्याशिवाय राहत नाहीत. अध्ययनाशी
असलेली त्यांची नाळ अद्यपि तुटली नसल्याने खरे तर, एका अभ्यासू विद्यार्थ्यांच्या मनोभूमिकेतूनच त्यांनी प्रस्तुतच्या पुस्तकाचे लेखन केले आहे, त्यामुळे ते जास्तीत जास्त परीक्षाभिमुख आणि स्वाभाविकतःच आयोगाच्या परीक्षार्थ्यांसाठी अधिकाधिक उपयुक्त झाले आहे.
एवम्, पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कोणत्या प्रकरणांना किती महत्व दिले गेले आहे, हे विचारात घेऊन त्या त्या प्रकरणाला दिले गेलेले महत्त्व; महत्त्वाच्या प्रश्नांच्या उत्तरांच्या गाभ्याशी स्थिरावणारी प्रकरण-रचना व नेहमीची साधी, सोपी भाषा ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये माझ्या विद्यार्थि-मित्रांना निश्चितच भावतील, यात शंकाच नाही. शुभेच्छापूर्वक !
आपलाच,
व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar)
Available at Ksagar Book Centre Granth
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
| Publication House | KSagar Publications |
|---|---|
| Language | Marathi |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.