Manovidnyan Achyut Godbole Chinmay Sarpotdar Marathi Book katha-kadambari (Novel)-Krishna मनोविज्ञान

Original price was: ₹400.00.Current price is: ₹320.00.

Author           :   Achyut Godbole Chinmay Sarpotdar 

Edition          :   1 ed 2025    

Language    ‏  :   Marathi

ISBN               :   9788199128095

Publisher      :  Krishna Publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Manovidnyan Achyut Godbole Chinmay Sarpotdar Marathi Book katha-kadambari (Novel)-Krishna मनोविज्ञान

वि ज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, गणित, अशा अनेक विषयांसोबतच मानसशास्त्र हादेखील माझ्या आवडीचा विषय अगदी पूर्वीपासूनच होता. मी आय.आय.टी. ला असताना आमच्या मित्रांचा एक मोठा ग्रुपच जमला होता. त्याकाळात आम्हाला कितीतरी विषायात रस होता. अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, संगीत, कला, कायदा, गणित, आणि अशा कितीतरी विषयांवर आमच्या अगदी तासन्तास गप्पा होत असत. मी आय.आय.टी.मध्ये जरी केमिकल इंजिनियरिंग शिकत असलो, तरी त्यासोबतच या अनेक विषयांचा अभ्यास करायची संधी मला तिथे मिळाली. शिक्षण पूर्ण करून फक्त अमेरिकेला जायचं, एवढंच उद्दिष्ट आमचं कधीच नव्हतं. भारत देशात गरिबी का आहे ? समाजात वाढणारी विषमता, कामाचं स्वरूप खालावणे, वाढणारा एकाकीपणा, बेकारी आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून समाजात वाढत जाणाऱ्या नैराश्य आणि चिंता यांसारख्या गंभीर मानसिक समस्या, हे त्याकाळातही माझ्या नजरेत येत असे. या गोष्टींचा त्रास आम्हाला होत असे. आपण या गोष्टी सुधारण्यासाठी काही करू शकतो का, असा विचार मनात येत असे आणि याच काळात मी प्रथम मानसशास्त्राचाही अभ्यास केला.

नंतर पुढची बरीच वर्षं मी इतर सर्व विषय सोडून माझ्या नोकरीमध्येच पूर्णपणे व्यस्त होतो. सी.ई.ओ. म्हणून अनेक कंपन्या चालवण्याचा, विविध माणसांसोबत काम करायचा अनुभव मला आला. माणसांना येणारं नैराश्य, चिंता आणि असेच मनोविकार मी प्रत्यक्षात बघितले. ते बघून माझं मन व्यथित होत असे आणि मला मनोविज्ञान नीट शिकावं, समजून घ्यावं, असं वाटत असे. त्यातच दुर्दैवानं माझ्या मुलाला ‘ऑटिझम’ या मानसिक आजाराचे निदान झाले. या निमित्तानं मी ‘ऑटिझम’ या विषयवार खूपच वाचन केलं आणि माझा मानसशास्त्र या विषयातला रस आणखीन वाढत गेला.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.