Mahasuli Wad-Prashne Aani Niwarana (महसुली वाद-प्रश्ने आणि निवारण)-Sanjay Kundetkar
मनोगत
महसुली नोंदी या महसूल खात्याचा आत्मा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या नोंदी अनेक व्यवहारांशी निगडीत असतात. चुकीची नोंद किंवा त्यावरील चुकीचा निर्णय हा अनेक पिढ्यांपर्यंत वादाचे कारण बनु शकतो. त्यामुळे महसुली नोंदींबाबतच्या कायदेशीर अद्ययावत तरतुदी अचूकरित्या माहित असणे महसूल अधिकाऱ्यांसाठी अनिवार्य आहे.
या पुस्तकामध्ये मी, विविध स्त्रोतांतून अनेक उपलब्ध लेख, पुस्तके, मला विविध प्रशिक्षणात तसेच विविध माध्यमांतून विचारले गेलेले प्रश्न यांची कायदेशीर उत्तरे आणि मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात महसूल कायद्यातील तरतुदी तसेच अर्ध-न्यायीक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी न्यायालयांनी दिलेले निर्देश उपलब्ध करून दिले आहेत.
या पुस्तकाचे लिखाण करतांना मा. श्री. शेखर गायकवाड सर (भा.प्र.से.) यांचे अमूल्य मार्गदर्शन प्राप्त झाले हे मी माझे भाग्य समजतो.
हे पुस्तक राज्यातील ग्राम महसूल अधिकाऱ्यांपासून ते वर्ग एकच्या अधिकारी वर्गासाठीसुध्दा उपयुक्त ठरेल असा माझा विश्वास आहे.
डॉ. श्री. संजय कुंडेटकर उपजिल्हाधिकारी (नि)
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.