Maharastracha Bhugol (महाराष्ट्राचा भूगोल)-Kapil Pawar,Ranjan Kolambe Bhagirath
प्रस्तावना
सर्वांना नमस्कार….
बदल आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. स्पर्धा परीक्षा व बदल पाचे अतुट नाते आहे. जगातील बदलाशी समायोजित होवून अभ्यास केला, तरच आपण तग धरू शकू पाची मला जाण आहे. मी स्वतः २००७ पासून ते आजपर्यंत हा बदल जगलो आहे. एका तपापेक्षा अधिक कालावधी महाराष्ट्र भूगोल विषयाची नियमित तपश्चर्या करुन आज पाचवी आवृत्ती आपणास देत आहे. ही आवृत्ती करताना उपयुक्त माहिती कमी शब्दात, आवश्यक तेथे नकाशे व कमी किंमत ही त्रिसूत्री डोळ्यासमोर ठेवली आहे. शासकीय संदर्भ, आकडेवारी, मागील सर्व प्रश्नपत्रिका, रिपोर्ट व सर्वांत महत्वाचे स्टेटबोर्डचा पुरेपूर उपयोग केला आहे.
आपण सर्वांनी महाराष्ट्र भूगोलाची विविध रंगात आवृत्ती आणावी असे अभिप्राय दिले होते. मा. रंजन कोळंबे सरांनी व्यावहारिक दृष्टीकोन न बघता मागील पुस्तकाच्या किमतीतच सुधारीत ४ कलर आवृत्ती आपणास आज भेट दिली. या आवृत्तीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच आज पाचवी आवृत्ती अद्यावत माहितीसह आपणास देण्यास आनंद होत आहे. मा. पूनम कोळंबे मॅडमांच्या प्रस्तावानुसार मी माझ्या अभ्यासकालीन नोट्स पुस्तकात प्रकाशित करायला अनुमती दिली होती. भगीरथ प्रकाशनाने पुस्तकाचा दर्जा कायम ठेवत, माहिती अद्यावत करुन, विविध रंगातील या पुस्तकामुळे अप्रत्यक्षपणे माझी विद्यार्थ्यांप्रती उपयुक्तता वाढवलेली आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे.
या पुस्तकात महाराष्ट्राविषयी अतिशय सखोल, परिक्षाभिमूख व सोप्या भाषेतील माहिती मांडली आहे. पुस्तकातील सर्व माहिती बिनचूक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक टॉपीकची व्याप्ती लक्षात घेवून माहिती व मांडणी असल्याने महाराष्ट्र भूगोलसाठी कुठल्याही परीक्षेला हे पुस्तक One Man Army ठरेल.
खूप अभ्यास करा. संकल्पना लक्षात घ्या, नकाशे मी स्वतः काढले होते, त्यामुळे लक्षात येतील. मुख्य ऊर्जास्त्रोत श्री. रंजन सर व श्रीमती पूनम कोळंबे मॅडम यांचा मी शतशः आभारी आहे. माझे आई-वडील, पत्नी स्नेहा कुडचे-पवार (Dy. CEO, Z.P.Jalgaon) यांची साथ सदैव असल्याने हे शक्य झाले आहे. सर्व शुभचिंतकांचे हृदयापासून आभार मानतो, धन्यवाद !
This is not only book,
it’s exprience of travelling
wihout changing your position
HAPPY READING TO ALL..
कपिल जयकर पवार
Available at Ksagar Book Store or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065
Reviews
There are no reviews yet.