Lokseva MPSC Marathi Prashnsanch Spashtikarnasah Set : B 1984 To 2026- Appa Hatnure

Original price was: ₹750.00.Current price is: ₹525.00.

Author          : Appa Hatnure, Sainath Dahale , Santosh Hatnure

Edition          : 9 th-2026-27

Language ‏    :  Marathi

Publisher: ‎   : lokseva publication / लोकसेवा पब्लिकेशन

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Lokseva MPSC Marathi Prashnsanch Spashtikarnasah Set : B 1984 To 2026- Appa Hatnure

प्रस्तावना

मराठी व इंग्रजी हे विषय जवळ-जवळ सर्वच स्पर्धा परीक्षा/सरळसेवा भरतीत अनिवार्य विषय आहेत. म्हणून या पुस्तकात आयोगाची 1984 पासून 2025 पर्यंतची सर्वच स्पर्धा परीक्षा पेपर्स (राज्यसेवा, PSI, STI, ASO, Excise PSI, PSI, dASO, dSTI, Tax Asst, Clerk typist, Technical Ast, Forest services, Agriculture services, Engg. services) म्हणजे जवळ-जवळ 140+ प्रश्नपत्रिकांचे घटकानुसार रचना या पुस्तकात केली आहे तसेच त्या घटकावरील प्रश्न झाल्यानंतर त्या घटकाशेवटी त्या-त्या घटकातील रह आलेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरणासह अवघड प्रश्नांचे स्पष्टीकरण व तो घटक कसा सोडवला पाहिजे या सर्व गोष्टी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना हवी असणारी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ‘चुका नसलेले व विश्वास ठेवण्यास पात्र’ असे पुस्तक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी सर्वच प्रश्नांसाठी आयोगाच्या Final key चा वापर करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे इंग्रजीमधील घटकाशेवटी अधिक स्पष्टीकरणासह ते मराठीतून दिले आहे. जेणेकरून विद्यार्थी त्या घटकामागील स्पष्टीकरण/टेबल/चार्ट वाचून त्या घटकावरील सर्वच प्रश्न सोडवू शकावे असे निर्माण केले आहे. तसेच मराठी व इंग्रजी या दोन्ही विषयांची रचना करताना Grammar व vocabulary part वेगवेगळा देण्याचा प्रयत्न केला आहे. हे सर्व करताना इंग्रजी व मराठीसाठी वेगवेगळ्या संदर्भ पुस्तकांचा वापर करून त्यावरील माहिती व स्पष्टीकरण देण्यासाठी उपयोगी आणले आहेत.

हे सर्व कार्य पार पाडण्यासाठी जवळ-जवळ 6 महिन्यांचा कालावधी लागला. तसे तर आम्ही PSI परीक्षेच्या अगोदरच आणणार होतो; पण आम्हाला पुस्तकात चुका मान्य नव्हत्या म्हणून आम्ही 8 ते 9 Proof readings करून सरतेशेवटी हे पुस्तक पूर्णत्वास आणले. या कामात मला पुस्तक काढण्यासाठी लागणाऱ्या सर्व भौतिक गोष्टी व आर्थिक बाबी उपलब्ध करून देणारे व प्रत्यक्ष पुस्तकास मदत करणारे माझे मित्र व संपादक साईनाथ प्रभाकरराव डहाळे यांचा मी शतशः ऋणी आहे व ऋणात रहाणेच आवडेल. श्याम वाखर्डे (Dy. CEO) यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले, त्याबद्दल त्यांचाही मी ऋणी आहे. त्यानंतर पुस्तकाच्या प्रत्यक्ष proof reading अगोदर पुस्तकांची रचना year वाईज लावण्याचे कार्य स्वतः माझा भाऊ संतोष हातनुरे व अनिल अभंगे यांनी केलेले आहे. तसेच या दोघांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजीचे proof reading करण्यासही मदत केली आहे. ज्याचे नाव घेताना मला गर्व होतो व अभिमान वाटतो ते आमचे संजय मुत्तलवार ज्याच्यामुळे मराठीला पारदर्शकता प्राप्त झाली आहे. इंग्रजी या विषयासाठी सागर निकम (RBI, Asst) (IBPS PO) व प्रविण स्वामी (RBI Grad B-2018) (EPFO – UPSC 2017 – SBI PO 2016, 2017, CMO INTERN 2015) यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर इंग्रजी विषयात चुकांना जागाच ठेवली नाही. हे सर्व झाल्यानंतर मी पुस्तकाची 8 वी, 9 वी proof reading करण्यासाठी माझे मित्र महेश जामनर (C.O.) राज्यसेवा Interview ला पात्र दिसत असतानाही वेळेतला वेळ काढून वेळ दिल्याबद्दल मी त्यांचाही ऋणी आहे.

पुस्तक काढण्यासाठी प्रोत्साहन देणारे माझे मित्र, प्रशांत गाजुला, ओम जांगिड (S/W. Engg.), साईनाथ सुरवसे (PSI), रवींद्र बारस्कर, पवन पाटील, पुष्पक टेंभुर्णेवार (SGGS), डॉ. गजानन कर्नेवाड (PSI), नवीन पेद्दाबोईना (S/W. Engg.) आहेत. पुस्तकाअगोदर व नंतरही मला सतत मदत करणारे अमोल डफळ, अमोल हिप्परगे, महेश बडे, विजय मते पाटील,

किरण निंभोरे, श्रीकांत ढगे तसेच पाचवी आवृत्तीसाठी राजेंद्र तालापल्लीवार, अभिजीत उपाध्ये, साईनाथ अंबिलवादे, विनायक नरवाडे, प्राजक्ता गलांडे, प्रफुल राठोड यांनी मला मोलाचे सहकार्य केल्याबद्दल यांचा मी आभारी आहे.

मागील पुस्तकासाठी दिलेल्या भरघोष प्रतिसादाबद्दल धन्यवाद….!

पुढील सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा…!

एच. एम. हातनुरे (आप्पा)

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.