

Lokamanya Tilak (लोकमान्य टिळक)-Dhananjay Keer Marathi Book katha-kadambari (Novel)
₹775.00 Original price was: ₹775.00.₹659.00Current price is: ₹659.00.
Author : Dhananjay Keer
Edition : 3 ed
Language : Marathi
ISBN : 9788171854486
Publisher : Popular Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Lokamanya Tilak (लोकमान्य टिळक)-Dhananjay Keer Marathi Book katha-kadambari (Novel)
प्रकाशकाचे निवेदन
धनंजर कीर यांचा चरित्रकार म्हणून मराठीतदेखील दबदबा असला तरी प्रामुख्याने त्यांनी चरित्रलेखन इंग्रजीतून केले. कीर रत्नागिरीचे. तरुण वयात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सामाजिक काम प्रत्यक्ष पाहिले होते. सावरकरप्रणीत सशस्त्र क्रांतीचा वीरमार्ग आणि सामाजिक क्रांतीसाठी त्यांनी केलेले कार्य या दोहोंचाही त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांनी पहिले बृहद् चरित्र लिहिले ते सावरकरांचे आणि सावरकरांप्रमाणे मानवी मूल्यांसाठी झटणारा महापुरुष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र त्यांनी लिहिले. सामाजिक परिवर्तनाच्या ध्यासाने त्यांनी महात्मा जोतीराव फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांची चरित्रे लिहिणे क्रमप्राप्त होते.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरीचा. त्यांचा जहाल राष्ट्रवाद आणि ‘साधनानाम् अनेकता’ हे धोरण कीरांना स्फुरण देणारे होते. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील काहीशा प्रतिगामी विचारांमुळे कीरांना त्यांचे परखड चरित्र लिहिण्याची कल्पना सुचली. टिळक जन्मशताब्दीच्याप्रसंगी त्या कल्पनेला मूर्तरूप मिळाले आणि १९५९ साली टिळक चरित्राची पहिली आवृत्ती इंग्रजीत प्रसिद्ध झाली.
शाहूमहाराज, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या चाहत्यांच्या आग्रहावरून आणि सामाजिक परिवर्तनाच्या आस्थेमुळे कीरांनी स्वतः या तिघांची चरित्रे मराठीतूनही लिहिली. त्याचप्रमाणे लोकहितकर्ते बाबासाहेब बोले यांचे चरित्र त्यांनी मुळातून मराठीत लिहिले.
भारताच्या राजकीय इतिहासातील वेगळी वळणे दाखविणारी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि वीर सावरकर यांची चरित्रे मात्र फक्त इंग्रजीतून उपलब्ध होती. त्यांपैकी सावरकर चरित्राचा मराठी अनुवाद कीरांनी स्वतः द. पां. खांबेटे यांच्याकडून करवून घेतला. इतर चरित्रांचे मराठी अनुवाद राहिले होते.
धनंजय कीरांचे चरित्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी टिळक चरित्राचा अनुवाद करण्याचे बिकट काम हातात घेऊन पूर्ण केले. या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनामुळे टिळकांच्या कार्याकडे नव्याने पाहण्याची सोय झाली आहे. राजेंद्रप्रसाद मसुरकर आणि डॉ. सुनीत कीर यांचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.
इंग्रजी आणि मराठी टिळक चरित्रांसाठी तत्परतेने छायाचित्रे उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही केसरी ट्रस्टचे डॉ. दीपक टिळक आणि केसरी संग्रहालयाचे अमोल पवार आणि तृप्ती देवकर यांचेही आभारी आहोत.
या पुस्तकाचा अनुवाद तपासण्यासाठी सुचेता नलावडे यांची आणि मुद्रित शोधनाच्या किचकट कामात ज्योत्स्ना बोर्डे यांची मोलाची मदत झाली. त्याचप्रमाणे पुस्तकाची अक्षरजुळणी करणारे संतोष गायकवाड आणि पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि छायाचित्राची मांडणी करणारे निर्मिती ग्राफिक्स या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.