Lakshyavedh Chalu Ghadamodi Ank 77 July To September 2025 (चालू घडामोडी)- Baliram Halave
₹140.00 Original price was: ₹140.00.₹98.00Current price is: ₹98.00.
Author : Baliram Havale
Edition : 77 th -2025
Language : Marathi
Publisher : Sahyadri Prakashan Aurangabad
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Lakshyavedh Chalu Ghadamodi Ank 77 July To September 2025 (चालू घडामोडी)- Baliram Halave
प्रस्तावना
“मैं अकेलाही चला था, जानिबे मंझिल मगर….. लोग साथ आते गये और कारवाँ बनता गया” असे म्हणत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत माझ्यासारखी अनेक मुले ‘एकला चलो’ अशा आविर्भावात मार्गक्रमण करत असतात. अशा वेळी ‘लक्ष्यवेध’ सारखी पुस्तिका सोबती असते. संशोधनपूर्ण माहिती संकलक आणि प्रेरणादायी अशी पुस्तकनिर्मिती केली म्हणून मी श्री. प्रा. बळीराम हावळे यांचे हार्दिक आभार मानून शुभेच्छा देतो. महाराष्ट्रीयन उमेदवारांमध्ये अनेक वाट चुकलेले अर्जुन भेटतात, परंतु त्यांना सावरणारे गुरू द्रोण म्हणून कुणी पुढे येत नाही. ज्ञान सर्रास उपलब्ध आहे. परंतु कुणी कृष्ण म्हणून पाठीशी उभे राहत नाही. अशा वेळी ‘लक्ष्यवेध’ आपला खारीचा वाटा उचलण्याची भूमिका करते ते फक्त परीक्षाभिमुख, राजकीय आर्थिक आणि सामाजिक बाबींचा ऊहापोह म्हणून नाही तर प्रेरणादार्या मुलाखतीतून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविते. परीक्षाभिमुख अभ्यास विद्यार्थ्यांना यशाच्या जवळ नेतो. सर्व स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांकरिता ही पुस्तिका अतिशय महत्त्वपूर्ण असे संकलन एकाच ठिकाणी प्राप्त करून देते. त्यात राजकीय घडामोडीमध्ये देश-विदेश संबंध, त्यातून होणारे परिणाम, करार इत्यादीचा ऊहापोह, आर्थिक घडामोडीमधून देश-विदेश व्यापार, चलन त्याचप्रमाणे राजकीय, आर्थिक, देशांतर्गत घडामोडीवरही प्रकाश टाकलेला दिसतो.” हे देवा, मला खूप खूप आव्हान दे आणि हो ती स्वीकारण्यासाठी मला प्रचंड विजयशक्ती दे.” या उक्तीला साजेशी अशी मागील अंकांतील यशस्वी मुलांच्या प्रेरणादायी मुलाखतीमधून माझ्यासह अनेकांना फायदा होतो. ‘स्वतःचा दिवा स्वतः बना’ गौतम बुद्धांच्या ह्या उक्तीप्रमाणे अनेक धीरोदात्त नायकांचा प्रेरणादायी प्रवासदेखील उलगडून दिसतो. ‘अपयश आणि न्युनगंड ह्या गोष्टींना तिलांजली देऊन अनेक उमेदवार यशस्वी होताना दिसतात. त्यामुळेच, ‘स्वयंप्रेरणेचे दरवाजे आपण आपल्या अंतर्मनातूनच उघडायला हवेत. स्पर्धा परीक्षांकरिता पारंपरिक आणि प्रासंगिक ज्ञान आवश्यक आहे. हे सर्व ‘लक्ष्यवेध’ मधून विद्यार्थी उमेदवारांस उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. हावळे सर यांना मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा… माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात…. Dream, Dream and Dream…. Turn Dream in to Thoughts… &Thoughts will transform, themselves into Action’ शेवटी सॉक्रेटीसने प्लेटोचा दिवा पेटविला, प्लेटोने आदर्श राज्य
संकल्पनेतून अॅरिस्टॉटलचा दिवा पेटविला
आणि अॅरिस्टॉटलने ‘अलेक्झांडर’ म्हणजेच
सिकंदरास घडविले म्हणून आपणही
दिवा पेटवून घेऊया.
लेखक-प्रा. बळीराम हावळे 3
श्री. डॉ. निलेश श्रीराम अपार (उपजिल्हाधिकारी)
रा. पळसखेडे ता. जामनेर जि. जळगाव
लक्ष्यवेध चालू घडामोडी
अंक-77
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /020 -24453065
| Language |
|---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.