

Laingiktevar Bolu Kahi (लैंगिकतेवर बोलू काही)-Niranjan Ghate Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen
₹250.00 Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
Author : Niranjan Ghate
Edition : 9 ed
Language : Marathi
ISBN : 29959
Publisher : Samakaleen Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Laingiktevar Bolu Kahi (लैंगिकतेवर बोलू काही)-Niranjan Ghate Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen
मनोगत
लैंगिक व्यवहारांची माहिती मला फार लहानपणीच कळली. आपण जे पाहतोय त्याला लैंगिक व्यवहार म्हणतात याची कल्पनाही नव्हती अशा वयात. मी मुंबईत गिरणगावात वाढलो. लालबागला आमच्या घराभोवती तीन मोठ्या गिरण्या होत्या. आताचा आंबेडकर रस्ता तेव्हा सुपारीबाग रस्ता म्हणून ओळखला जायचा. तिथल्या गणेशभुवन इमारतीत आम्ही राहायचो. आमच्या घरासमोरच दोन गिरण्या होत्या. त्यामुळे हा भाग कायमच कामगारांच्या वर्दळीमुळे गजबजलेला असे. रस्त्यावर झिंगून पडलेले किंवा भोसकल्यामुळे कळवळून ओरडणारे कामगार, पगाराच्या दिवशी वसुलीसाठी गेटवर थांबलेले पठाण आणि संध्याकाळी रस्त्यावर गिऱ्हाइकांना खाणाखुणा करून बोलावणाऱ्या वेश्या ही माझ्यासाठी नेहमीची दृश्यं होती. याशिवाय रस्त्यावर कबुतरं, शेळ्या, गायी, कुत्री यांचा प्रणय चाले तो वेगळाच. फिरायला जाण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे राणीचा बाग. तिथेही पिंजऱ्याआडचे प्राणी प्रेक्षकांची तमा न बाळगता त्यांचा कार्यक्रम उरकून घेत. हे सगळं बघतच मी वाढलो.
मुंबईहून आम्ही माधवनगरला राहायला गेलो. ते एक आटपाट नगर होतं. एकमेकांना काटकोनात छेदणारे दोन प्रमुख रस्ते आणि त्यांना समांतर अशा दोन गल्ल्या, की गाव संपला. मुख्य गाव रेल्वेलाइनच्या एका बाजूला होतं. दुसऱ्या बाजूला रामोश्यांची पालं, लमाण वस्ती वगैरे होती. शाळेत अठरापगड जातीची मुलं होती. त्यातल्या रामोशी पोरांबरोबर भटकणं हा एक अनोखा अनुभव होता. मी त्यांच्यात वयाने सगळ्यांत लहान. त्यांच्या गप्पा बऱ्याच वेळा मला कळत नसत. ‘अमकी तमकी कुणाला तरी लागू आहे’, ‘ते दोघं पांदीत जाऊन काय काय करतात’ वगैरे.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.